Social Media Troll झालेल्या आईने संपवलं जीवन, स्तनपान करताना बाळ पहिल्या मजल्यावर पडलेलं

कोईमतूर : सोशल मीडियावरील ‘ट्रोलिंग’मुळे चेन्नईत एका महिलेने थेट आत्महत्येचे पाऊल उचलल्याची घटना घडली.

काय आहे प्रकरण?


चेन्नईतील व्ही. रम्या ही महिला आपल्या सात महिन्यांच्या मुलीला गॅलरीत स्तनपान करीत होती. त्या वेळी मुलगी हातातून निसटून पहिल्या मजल्यावर पडली. सुमारे १५ मिनिटांच्या अथक प्रयत्नांनी नागरिकांना मुलीला वाचवण्यात यश मिळाले. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी बाळाच्या आईला ‘ट्रोल’ केले. स्थानिक चॅनेलनेही संबंधित आईला निष्काळजी म्हटले होते; त्याचप्रमाणे मुलाला वाचवणाऱ्या शेजाऱ्यांचे कौतुक करीत होते. हे ‘ट्रोलिंग’ सहन न झाल्याने रम्या यांनी आत्महत्या केली.
एकाच वेळी निघाल्या पाच अंत्ययात्रा; देवळालीगाव नि:शब्द! मामा-भाच्यांना निरोप देताना नातेवाईकांना शोक अनावर
रम्या दोन आठवड्यांपूर्वी पती आणि दोन मुलींसह कोईमतूर येथे माहेरी आल्या होत्या. रविवारी रम्या यांचे आई-वडील आणि पती लग्नाला गेले होते. ते घरी परतले असता रम्या यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले. रम्या ‘आयटी’मध्ये काम करीत होत्या.

Source link

bad mother trollingbreast feedingCoimbatore NewsCoimbatore tamil nadusocial media mother trollsocial media trollingsocial media viral video
Comments (0)
Add Comment