इंडियन वेअरेबल मार्केट परफॉर्मन्स 2024
स्मार्ट वॉचेसच्या विक्रीत घट
वेअरेबल प्रोडक्ट्सच्या यादीत स्मार्ट वॉचेसचा नंबर पहिला येतो. या मार्केटमध्ये सगळ्यात लोकप्रिय डिवाइस म्हणून स्मार्ट वॉचेसकडे बघितले जाते. मात्र 2018 नंतर यात पहिली घट नोंदविण्यात आली होती. 3 टक्के दरवर्षाप्रमाणे 9.6 कोटी युनिट्स वॉचेसचा खप कमी झाला आहे.
वेअरेबल प्रोडक्ट्समध्ये स्मार्ट वॉचेसचा 37.6 टक्क्यांचा मार्केट शेअर आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत हे प्रमाण 41.4 टक्के होते. तसेच, स्मार्टवॉचची ASP देखील मागच्या वर्षी 29.24 अमेरिकन डॉलरवरून यावर्षी 20.65 डॉलर्सवर घसरली आहे. ऑनलाइन सेल डिस्काउंट आणि डील्समुळे असे होत आहे.
विशेष म्हणजे, स्मार्टवॉचचा मार्केट शेअर या तिमाहीत 3.2 टक्क्यांवर गेला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत 2.0 टक्के होता.
TWS इयरफोन्स आणि स्मार्टरिंग्जच्या विक्रीत मोठी वाढ
- इयरवेअर आणि इअरफोनची कॅटेगिरी 8.3 टक्क्यांनी वाढली आहे. या प्रोडक्ट्सची एकूण शिपमेंट 15.9 कोटी युनिट्सवर पोहोचली आहे.
- True Wireless Stereo (TWS) च्या विक्रीत 19 टक्के वार्षिक वाढ झाली आहे. या कॅटेगिरीने मार्केटमधील 70 टक्के हिस्सा व्यापला आहे.
- मार्केटमधील 70 टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा गाठणारी ही सर्वात आघाडीची कॅटेगिरी आहे. मात्र त्यांची ASP 7.3 टक्क्यांनी घसरून 16.62 अनेरिकन डॉलर्सवर आली आहे. हे कदाचित ऑनलाइन सवलती आणि ऑफरमुळे होत आहे. असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
- दरम्यान गेल्या वर्षभरात वायर्ड इअरफोन्सच्या 10.6 टक्के विक्रीत घट झाली.
स्मार्ट रिंग्जही ठरताय ग्राहकांची चॉइस
स्मार्ट रिंग सध्या अनेकांचे आकर्षण ठरत आहे. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 173 अमेरिकन डॉलर्सच्या ASPसह 64,000 स्मार्ट रिंगची विक्री करण्यात आली. अल्ट्राह्युमन ब्रॅंड हा या कॅटेगिरीतील मार्केट लीडर आहे.