Farmer Protest: शंभू सीमेवर शेतकऱ्यांची फौज; ‘दिल्ली चलो’ आंदोलनाला शंभर दिवस पूर्ण

वृत्तसंस्था, अंबाला : किमान हमी भावाचा कायदा करावा यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ‘दिल्ली चलो’ आंदोलनाला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, अनेक आंदोलक शेतकरी शंभू; तसेच इतर सीमांवर जमा झाले आहेत.

आपल्या विविध मागण्यांसाठी ‘दिल्ली चलो’ आंदोलनाची हाक दिलेल्या शेतकऱ्यांना सुरक्षा दलांनी दिल्लीच्या सीमेवर अडवल्यामुळे, हे आंदोलक १३ फेब्रुवारीपासून शंभू; तसेच खनौरी सीमेवर तळ ठोकून बसले आहेत. आंदोलनाला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शेतकरी शंभू आणि खनोरीसह दाबवाली सीमेवर जमले आहेत, अशी माहिती किसान मजदूर संघर्ष समितीचे नेते सरवानसिंह पंधेर यांनी दिली. दिल्लीत जाण्यापासून अडवणाऱ्या केंद्रातील भाजप सरकावर पंधेर यांनी टीकास्त्र सोडले. दिल्लीच्या पंजाब; तसेच हरयाणातील सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचाही त्यांनी निषेध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाबच्या प्रचारदौऱ्यात त्यांना प्रश्न विचारण्याचा मनसुबा पंधेर यांनी जाहीर केला आहे.

पंतप्रधानांच्या प्रचारादरम्यान निषेध

पंतप्रधान मोदी गुरुवारपासून पंजाबच्या दौऱ्यावर आहेत. पतियाळा येथे गुरुवारी मोदी यांच्या प्रचारसभेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी रॅली काढून निषेध नोंदवला. पंजाबमधील सर्व तेरा जागांसाठी सातव्या, शेवटच्या टप्प्यात एक जून

Source link

Delhi Chalo Farmer Protestdelhi chalo farmers marchdelhi chalo protestdelhi farmer protestsfarmers protestदिल्ली चलो
Comments (0)
Add Comment