धक्कादायक! तीन मित्र धरणात पोहण्यासाठी गेले, मात्र अचानक…

हायलाइट्स:

  • धरणाच्या पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू
  • बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला
  • संगमेश्वर पोलिसांकडून अधिक तपास सुरू

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील उमरे धरणात अंघोळ करताना बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह मंगळवारी धरणात आढळला आहे. ग्रामस्थांच्या मदतीने संगमेश्वर पोलिसांनी बुडालेल्या संदेश धोंडीराम मोहिते या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला.

उमरे बौद्धवाडीतील सागर मोहिते (२८), संदेश धोंडीराम मोहिते (वय अंदाजे ३६) आणि संतोष आग्रे (४९), हे तिघे नेहमीप्रमाणे सोमवारी दुपारी उमरे एसटीने संगमेश्वरला कामासाठी गेले आणि परत येताना उमरे धरणात अंघोळीला उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. हे दृश्य नजीकच शेतात काम करणाऱ्या ग्रामस्थांनी पाहिले आणि त्यांनी लगेच बुडणाऱ्यांना वाचवण्यासाठी धरणाच्या दिशेने धाव घेतली. यावेळी ग्रामस्थांना सागर मोहिते आणि संतोष आग्रे यांना वाचवण्यात यश आलं. मात्र संदेश मोहिते हा तरुण पाण्यात बुडून बेपत्ता झाला होता.

मंत्रालयात नोकरी लावतो असं सांगितलं, ५ लाख रुपयेही घेतले आणि नंतर…

या घटनेची माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कामेरकर व स्वप्निल जाधव हे घटनास्थळी दाखल झाले. बेपत्ता झालेल्या संदेश याचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली. मात्र सोमवारी या मोहिमेला यश आलं नाही. मंगळवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू झाली. अखेर मंगळवारी दुपारी २ वाजता संदेश याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला.

ग्रामस्थांच्या मदतीने हा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. शवविच्छेदनानंतर संदेशचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देशमुख, पोलीस नाईक सचिन कामेरकर यांनी घटनेचा पंचनामा केला. या प्रकरणी अधिक तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.

Source link

drownRatnagiri newsधरणात बुडून दोघांचा मृत्यूबुडून मृत्यूरत्नागिरी
Comments (0)
Add Comment