२५८ जागांवर मतदान टक्केवारी घटली, दक्षिण मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील २० जागा, धडधड कोणाला?

नवी दिल्‍ली : लोकसभा निवडणुकांचे पाच टप्प्यांतील मतदान पूर्ण झालं आहे. ४२८ जागांवरील उमेदवारांची भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाली आहेत. ४ जून रोजी निकाल जाहीर होतील, मात्र त्याआधीपासूनच विश्लेषण सुरु आहे. वाढलेल्या किंवा घटलेल्या मतटक्क्यांचा कोणावर कसा परिणाम होणार, याच्या बेरीज-वजाबाक्या चालू आहेत. अशातच टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार काही रंजक गोष्टी समोर आल्या आहेत. मतदान झालेल्या ४२८ पैकी ४०९ जागांचे विश्लेषण करण्यात आले आहे. त्यापैकी २५८ जागांवर २०१९ च्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत घट पाहायला मिळत आहे. तर त्यापैकी ८८ जागांवर २०१९ च्या तुलनेत मतांच्या संख्येतही घसरण झाली आहे. त्यामुळे मतदारांचा मूड काय सांगतो, याचं विश्लेषण सुरु झालं आहे.

एखाद-दुसऱ्या राज्यातच मतदानाच्या टक्केवारीत घसरण झाली, असं नाही. तर जवळपास प्रत्येक राज्यातच मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. उदाहरणार्थ, केरळच्या सर्व २० जागांवर मतदानाच्या टक्केवारीत घट पाहायला मिळत आहे. त्यापैकी १२ जागांवर २०१९ च्या तुलनेत मतांची संख्याही कमी आहे. तर उत्तराखंडमध्ये पाच जागांवरील मतदान कमी झाले आहे.
Pune Police : येरवडा पोलिसांची हलगर्जी, आमदार टिंगरे पोलीस स्टेशनला आले हे सत्य, पण.. पोलीस आयुक्तांचं उत्तर
राजस्थान आणि तमिळनाडूत जवळपास अर्ध्या जागांवर मतदारांच्या संख्येत घट आहे. तर ९० टक्के जागांवर कमी मतदानाची टक्केवारी नोंदवली गेली आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या भाजपप्रणित राज्यांत तीन चतुर्थांश जागांवर मतदान (टक्केवारी) घटले आहे. मात्र एक तृतीयांश जागांवर २०१९ च्या तुलनेत कमी मतांची नोंद झाली, ही त्यातल्या त्यात दिलाशाची बाब.
Gajanan Kirtikar : कारस्थानांची सवय भाजपची, कीर्तिकरांचे प्रत्युत्तर; शिंदे म्हणतात दिलगिरी व्यक्त केलेय, आता बघू
गुजरातमध्ये २०१९ च्या तुलनेत २५ टक्के जागांवर कमी मतदान झाले. त्याचप्रमाणे, बिहारमध्ये, २०१९ च्या तुलनेत २४ पैकी २१ जागांवर कमी मतदान झाले, परंतु केवळ एकाच जागेवर मतांची संख्या कमी झाली. महाराष्ट्रात ४८ पैकी २० जागांवर मतदानाची टक्केवारी कमी झाली, मात्र केवळ सहा जागांवर मतांची संख्या कमी झाली.

देशभरातील ज्या ४०९ जागांचं विश्लेषण केलं जात आहे, त्यापैकी ज्या सहा जागांवर २०१९ च्या तुलनेत कमी मतदारांची नोंद झाली, त्यापैकी पाच केवळ महाराष्ट्रातल्या जागा आहेत. त्यात दक्षिण मुंबई आणि पुणे या जागांचा प्रामुख्याने समावेश आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

यावेळी आंध्र प्रदेश, झारखंड, कर्नाटक, ओडिशा, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमध्ये २०१९ च्या तुलनेत मतांची टक्केवारी घटलेली एकही जागा नाही. मात्र, काही ठिकाणी कमी मतदान झाले. छत्तीसगढ हे एकमेव मोठे राज्य होते, ज्यात प्रत्येक जागेवरील मतदान आणि संपूर्ण मतांची संख्या – दोन्ही जास्त होती.

Source link

Lok Sabha Election Voting Percentagelok sabha elections 2024loksabha election 2024PuneSouth Mumbaiदक्षिण मुंबईपुणे लोकसभालोकसभा निवडणूक मतदान टक्केवारीलोकसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment