WhatsApp हे एक इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे, जे जगभरातील लाखो लोक वापरतात. लोकांची काही सेंसेटिव्ह माहिती किंवा आवश्यक संदर्भ या WhatsApp चॅटवर असण्याची शक्यता असते. अशावेळी हे चॅट प्रायव्हेट राहणे तसेच सेफ राहणे महत्वाचे ठरते. यासाठीच येथे काही महत्वाच्या टिप्स देत आहोत.
एंड-टू-एंड एन्क्रिप्शन
तुम्ही तुमच्या चॅटचा iCloud किंवा Google Drive वर बॅकअप घेतला तरीही ते हॅक केले जाऊ शकतात. तुमचे मेसेज सुरक्षित ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे बॅकअपसाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन चालू करणे. क्लाउड स्टोरेज कंपन्या देखील तुमच्या बॅकअप केलेल्या चॅट्स पाहू शकणार नाहीत याची हे सुनिश्चीती करते. हे चालू करण्यासाठी, सेटिंग्ज > चॅट्स > चॅट बॅकअप वर जा.
डिसअपीयर मेसेजेस
तुमची खाजगी संभाषणे नष्ट होऊ नयेत असे वाटत असल्यास, WhatsApp चे डिसअपीयर मेसेजेस फीचर वापरा. तुम्ही 1 दिवस, 7 दिवस किंवा 90 दिवसांनी मेसेज आपोआप हटवण्यासाठी टायमर सेट करू शकता. हे फीचर चॅटमध्ये शेअर केलेल्या सर्व फोटो आणि व्हिडिओंनाही लागू होईल.
चॅट लॉक चालू करा
तुमचा प्रायव्हेट चॅट अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी, तुम्ही चॅट लॉक फीचर वापरू शकता. तुम्ही लॉक करू इच्छित असलेला चॅट निवडा आणि नंतर “लॉक चॅट” ऑप्शन निवडा. हे केल्यानंतर, तुमची निवडलेली चॅट लॉक होईल आणि फक्त तुम्हीच ती चॅट पाहू शकाल.
कॉल रिले फीचर चालू करा
हॅकर्सना तुमचा मागोवा घेणे अवघड बनवण्यासाठी तुम्ही ‘protect ip address in calls’ फीचर वापरू शकता. ते एनेबल करण्यासाठी, सेटिंग्ज >प्रायव्हसी > कॉल वर जा आणि हा ऑप्शन चालू करा.
अननोन कॉल सायलेंट करा
“सायलेन्स अननोन कॉलर” हे फीचर तुम्हाला स्पॅम आणि अनोळखी कॉल टाळण्यास मदत करेल. हे फीचर एनेबल करण्यासाठी, सेटिंग्ज >प्रायव्हसी > कॉल वर जा आणि हा ऑप्शन चालू करा.