तरुण एकाएकी बेपत्ता, कुटुंबियांनी आशा सोडली; २६ वर्षांनी शेजाऱ्याच्या घरात सापडला

मुंबई: दररोज अनेकजण बेपत्ता होतात, त्यातले काही सापडतात तर काही अनेक वर्ष बेपत्ता असतात. त्यामुळे काही वर्षांनी त्यांना मृत समजलं जातं. पण, जर २६ वर्षांपासून बेपत्ता असलेली व्यक्ती अचानक सापडली तर आणि तिही शेजारीच सापडली तर नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल. नुकतंच अल्जीरियाच्या जेल्फा शहरात असंच काहीसं घडलं आहे.

उमर बी नावाची व्यक्ती अल्जेरियन सिव्हिल वॉरदरम्यान १९९८ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी गायब झाली होती. देशाच्या न्याय मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केले की ती व्यक्ती शेजारच्या घरात सापडली आहे. १९९८ मध्ये त्याच्या कुटुंबीयांनी गृहीत धरले होते की त्याचे अपहरण झाले असेल किंवा त्याची हत्या करण्यात आली असेल. पण, आता वयाच्या ४५ व्या वर्षी तो त्याच्या कुंटुबाला भेटला आहे.

हे प्रकरण तेव्हा उघडकीस आले जेव्हा उमरचे अपहरण करुन ठेवलेल्या व्यक्तीच्या भावाने मालमत्तेच्या वादाची तक्रार केली. तेव्हा उमर त्या घरात पेंढ्याच्या ढिगाऱ्यात बसलेला आढळून आला.

उमर सापडताच त्याचं अपहरण करणारा शेजारी ६१ वर्षीय अपहरणकर्ता पोलिसांच्या भीतीने पळून गेला होता. पण, नंतर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. अल्जेरियन मीडियाच्या वृत्तानुसार, पीडित व्यक्तीने सांगितले की तो कोणाकडेही मदत मागू शकत नव्हता. अनेक वर्षांपासून अपहरणकर्त्याने त्याच्यावर मंत्रांच्या मदतीने काही जादू केली होती. याप्रकणात मंत्रालयाने सांगितलं की, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे आणि पीडित व्यक्तीवर उपचार केले जात असून त्याच्या मानसिक स्थितीचीही काळजी घेतली जात आहे.

यापूर्वीही अशा प्रकारची अनेक प्रकरणं समोर आलेली आहेत. काही वर्षांपूर्वी अशी घटना घडली होती ज्यामध्ये वर्षानुवर्षे बेपत्ता असलेली एक व्यक्ती आपल्याच घराच्या तळघरात सापडली होती आणि कोणाला त्याची माहितीही नव्हती.

Source link

algeriaman missing for 26 yearsman missing in 1998missing man foundmissing person found after 26 yearsneighbours homeviral newsबेपत्ता व्यक्तीबेपत्ता व्यक्ती शेजाऱ्याच्या घरी सापडलाव्हायरल न्यूज मराठी
Comments (0)
Add Comment