Mahalaxmi Temple Guidelines: अंबाबाई दर्शनासाठीही नियमावली जाहीर; बुकिंग केले नसेल तर…

हायलाइट्स:

  • राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये दर्शनासाठी नियमावली.
  • अंबाबाई दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंगची व्यवस्था.
  • भाविकांना बुकिंगशिवाय थेट मुखदर्शन घेता येणार.

कोल्हापूर : नवरात्रोत्सवात अंबाबाई दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी या काळात दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. बुकिंगशिवाय थेट मुखदर्शन घेण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले. ( Mahalaxmi Temple Guidelines Updates )

वाचा: शिर्डीचं साई मंदिरही उघडणार; गाइडलाइन्स जारी, दर्शनासाठी ‘ही’ अट नाही!

दोन दिवसात नवरात्रोत्सवास सुरुवात होणार आहे. अंबाबाई मंदिरात त्याची जय्यत तयारी सुरू आहे. सोमवारी दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली. दर्शन मंडपही उभारण्यात आला आहे. ऑनलाइन बुकिंग करण्यासाठी mahalaxmikolhapur.com या संकेत स्थळावर सोय करण्यात आली आहे. यासाठी मोबाइल क्रमांक व आधारकार्ड नंबर आवश्यक आहे. बुकिंग केल्यानंतर मोबाइलवर क्यूआर कोड येईल. तो दाखविल्यानंतरच दर्शन रांगेत प्रवेश देण्यात येईल.

वाचा: मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आणखी एका घोटाळ्याचा आरोप!

शिवाजी चौक व एमएलजी हायस्कूल या दोन ठिकाणांहून दर्शनासाठी रांग सुरू होईल. रांगेत येतानाच प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येईल. सॅनिटायझरचीही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या रांगेत गर्भवती महिलांना प्रवेश मिळणार नाही. सर्दी, ताप, खोकला असलेल्या व्यक्तींनी या रांगेत येऊ नये, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे. जेथून रांग सुरू होईल, तेथेच चप्पल स्टँडची सोय करण्यात आली आहे. किमान दोन हजार लोकांना येथे चप्पल ठेवता येतील. येथे पिण्याच्या पाण्याची सोयही उपलब्ध करण्यात आली आहे. गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी तीनशे पोलीस व आपत्ती व्यवस्थापनाचे तीनशे जवान तैनात करण्यात आले आहेत. शहरात पार्किंगसाठी १९ ठिकाणी सोय करण्यात आली आहे. महाद्वार रोड वरून देवीच्या मुखदर्शनाची सोय करण्यात आली असून यासाठी बुकिंगची गरज नाही.

दरम्यान, वाडी रत्नागिरी येथील जोतिबा मंदिरातही दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंग करणे गरजेचे आहे. यासाठी shreejyotiba.com या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध आहे, असे सांगण्यात आले.

वाचा: पुणे विमानतळ ‘या’ तारखेपासून १५ दिवस राहणार बंद; ‘हे’ आहे कारण

Source link

kolhapur mahalaxmi darshan latest newskolhapur mahalaxmi navratri utsavkolhapur mahalaxmi templemahalaxmi temple guidelinesmahalaxmi temple guidelines updatesअंबाबाईजोतिबानवरात्रोत्सवास सुरुवातपश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमुखदर्शन
Comments (0)
Add Comment