OnePlus 12 वरील ऑफर
या फोनमध्ये तुम्हाला प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट मिळेल. फोनमध्ये देण्यात आलेला 2K डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनचा मेन कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे. याची बॅटरी 5400mAh ची आहे, जी 100 वॉट SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. 16जीबी रॅम आणि 512जीबी स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 69,999 रुपये आहे. डीलमध्ये तुम्ही हा 2 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करता येईल. या डिस्काउंटसाठी तुम्हाला HDFC किंवा IDFC बँकेच्या कार्डनं पेमेंट करावे लागेल. या फोनवर 3500 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देखील दिला जात आहे. फोनवर 44,250 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील लाइव्ह आहे.
iPhone 15 वरील ऑफर
अॅमेझॉन 5G सुपरस्टोर मध्ये आयफोन 15 चा 128जीबी स्टोरेज असलेला ब्लू कलर व्हेरिएंट 70,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. फोन खरेदीसाठी जर तुम्ही SBI किंवा ICICI बँकेच्या कार्डचा वापर केला तर तुम्हाला 4 हजार रुपयांपर्यंतचा इंस्टंट डिस्काउंट मिळेल. एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन 44,250 रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतो. कंपनी या फोनवर सुमारे 3350 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देखील देत आहे. फीचर्स पाहता, आयफोन 15 मध्ये तुम्हाला डायनॅमिक आयलंडसह 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळेल. फोनचा मेन कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे.
OnePlus 12R वरील डिस्काउंट
वनप्लसच्या या फोनमध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसर मिळेल. यात देण्यात आलेल्या 1.5K डिस्प्लेची पीक ब्राइटनेस लेव्हल 4500 निट्स पर्यंत आहे. कंपनी या फोनमध्ये 5500mAh ची बॅटरी देत आहे, जी 100 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. वनप्लस 12आर का 8जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज असलेला व्हेरिएंट सेलमध्ये 39,990 रुपयांना मिळत आहे. HDFC बँकेच्या कार्डनं पेमेंट केल्यास तुम्हाला 2 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळेल. कंपनी या फोनवर सुमारे 2 हजार रुपयांचा कॅशबॅक देखील देत आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही हा 37,990 रुपयांपर्यन्त स्वस्तात खरेदी करता येईल. हा फोन ईएमआयवर देखील तुमचा होऊ शकतो.