सोनी मराठीवरील नवी मालिका कुसुमसाठी एरंडोलला 7 रोजी प्रमोशन शो..! महिलांसाठी मनोरंजनपर खेळांचे आयोजन-मालिकेतील माहिती आणि व्हिडीओचे होणार प्रसारण..!

एरंडोल :सोनी मराठी वरील नवी मालिका कुसुमसाठी एरंडोलला दि. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता (घटस्थापनेच्या दिवशी) पांडववाडा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यादरम्यान शहरातील महिलांसाठी मनोरंजनपर खेळांचे आयोजन आणि ‘कुसुम,या नवीन मालिकेची माहिती आणि व्हिडीओ प्रसारीत करण्यात येणार आहे. तरी सदर कार्यक्रमास महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती द्यावी.असे आवाहन येथील सामाजिक कार्यकर्त्या आरती कुंदनसिंह ठाकूर यांनी केले आहे.
सोनी मराठी ही महाराष्ट्रातील अल्पावधीतच लोकप्रिय झालेली मराठी मनोरंजनपर वाहिनी आहे. वाहिनीवर आजवर अनेक दर्जेदार आणि वेगवेगळ्या विषयांवरील मालिका सादर झाल्या आहेत.अशीच एक मालिका स्त्रियांच्या भावविश्वावर आधारित आणि लग्नानंतरही संसार आणि माहेर यात समतोल राखणारी,आई वडिलांची काळजी करणार्‍या,तुमच्या-आमच्या घरातील गृहिणींसारख्या ‘कुसुम, या महीलेवर आधारीत ही मालिका आहे. सदर मालिकेसाठी कार्यक्रम एरंडोल येथे आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात कुसुम मालिकेची माहिती आणि व्हिडिओ दाखविण्यात येतील तसेच महिलांसाठी मनोरंजनपर खेळ आयोजित करण्यात येतील. दिवसभर घर सांभाळणार्‍या गृहिणींना आणि तिच्या कुटुंबियांना दोन क्षण स्वतःसाठी उसंत मिळावी आणि एकत्र येऊन थोडावेळ आनंदात घालवता यावा हा यामागील उद्देश आहे. या कार्यक्रमाचा खर्च सोनी मराठी वाहिनीतर्फे करण्यात येणार आहे. तरी आपण यासाठी योग्य सहकार्य करण्याचे आवाहन सोनी टी.व्ही. ब्रॉडकास्ट व आरती ठाकुर यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

Comments (0)
Add Comment