AC ही फेकू शकतो गरम हवा; योग्य काळजीसाठी ‘या’ 5 गोष्टींकडे लक्ष द्या

उन्हाळ्यात, विशेषत: भारतात, एसी हे घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या सामान्य उपकरणांपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांत नवीन तंत्रज्ञानामुळे एसी जास्त काळ चालू लागले आहेत. तेंव्हा अधिक काळ एसी वापरतांना कुठली काळजी घ्यायला हवी याविषयी येथे माहिती देत आहोत.

जास्त स्पीडमध्ये पंखा लावू नका

गरम खोली लवकर थंड करण्यासाठी एसी बसवण्यासोबतच पंखा कमी किंवा मध्यम गतीने चालवणे फायदेशीर ठरते. असे केल्याने, थंड हवा संपूर्ण खोलीत पसरते आणि खोली लवकर थंड होते. परंतु, लक्षात ठेवा, एसी चालू असताना पंखा अतिशय वेगाने चालवणे योग्य नाही अशाने खोली थंड व्हायला वेळ लागू शकतो.

5 स्टार रेटिंग नेहमी टिकते का?

भारतात, AC ची कार्यक्षमता मोजण्यासाठी ISEER (इंडियन सीझनल एनर्जी एफिशिएन्सी रेशो) नावाचा स्केल वापरला जातो. हे सांगते की एसी एका वर्षात किती थंड हवा देतो आणि तेवढी हवा थंड करण्यासाठी किती वीज खर्च करतो. हे मोजमाप 24 ते 43 अंश सेल्सिअस तापमान लक्षात घेऊन केले जाते. त्यामुळे एसीचे रेटिंग दरवर्षी बदलू शकते. याचा अर्थ, या वर्षी 5-स्टार असलेला AC पुढील वर्षी नसेल.

एसी कमी तापमानात जास्त गारवा देतो का?

अनेकांना वाटते की एसीचे तापमान जितके कमी होईल तितक्या लवकर खोली थंड होईल. पण हे चुकीचे आहे. ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सी (बीईई) सांगते की, मानवी शरीरासाठी २४ अंश सेल्सिअस हे सर्वोत्तम तापमान आहे. या तापमानात एसी चालवल्यास कमीत कमी विजेचा वापर होतो, तर तापमान खूप कमी ठेवल्यास एसीला जास्त वीज वापरावी लागते.

एसी थेट सूर्यप्रकाशात ठेवावा का?

जरी एसीचे काम खोली थंड ठेवणे आहे तरी चांगले काम करण्यासाठी, तुमचा एसी स्वतःच थंड असणे आवश्यक आहे. त्यामुळे एसी थेट सूर्यप्रकाशापासून दूर किंवा सावलीच्या ठिकाणी लावा. यामुळे एसी जास्त गरम होणार नाही आणि खोली लवकर थंड होऊ शकेल. जर एसी आधीच खूप गरम होत असेल तर खोली थंड होण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो.

फिल्टर कधी साफ करायचा?

एसी चांगला चालण्यासाठी आणि कमी वीज वापरावी यासाठी एसी फिल्टर्स स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. फिल्टर घाण झाल्यास, कमी हवा वाहते आणि एसीला जास्त काम करावे लागते, ज्यामुळे विजेचा वापर वाढतो. त्यामुळे एसी फिल्टर दर दोन आठवड्यांनी स्वच्छ करावेत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे हवा चांगली वाहते आणि खोली लवकर थंड होईल.

Source link

5 star rating5 स्टार रेटिंगACsummer daysउन्हाळाएसी
Comments (0)
Add Comment