आता तुमच्या आवाजात बोलेल AI, Truecallerने लाँच केले नवीन फिचर, असे करा अनेबल

कॉलर आयडी सर्च करून देणारी कंपनी Truecaller ने मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने आपल्या ॲपमध्ये एक नवीन फीचर जोडले आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स त्यांच्या आवाजात AI असिस्टंट वापरू शकतील. Truecaller चे हे फिचर सध्या प्रीमियम अकाउंट्ससाठी उपलब्ध आहे. लवकरच सर्व युजर्स हे फिचर वापरू शकतील असेल सांगण्यात येत आहे.

Truecallerने 2022मध्ये AI असिस्टंट फीचर लाँच केले आहे. या फीचरमध्ये संपूर्ण एआय तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामध्ये ऑटोमॅटिक कॉल आन्सरिंग, फिल्टर कन्वर्जेशन, एक्सेप्टिंग मॅसेज, आणि कॉल रिकॉर्डिंगसारख्या फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

AI तुमच्या आवाजात कॉलरशी बोलेल

नवीन AI फीचरबद्दल माहिती देताना, Truecaller Israel चे प्रोडक्ट डायरेक्टर आणि जनरल मॅनेजर Raphael Mimoun म्हणाले की, आमचे यूजर्स या फीचरच्या मदतीने AI असिस्टंट म्हणून त्यांचा आवाज वापरू शकतील. हा AI असिस्टंट फोन कॉल उचलेल आणि कॉलरशी तुमच्या आवाजात बोलेल.
यूजरने तुमचा कॉल उचलल्यास त्यांना ट्रूकॉलरच्या एआय असिस्टंट तुमच्या आवाजात उत्तरे देईल. हा आवाज बऱ्याच प्रमाणात तुमच्या आवाजाची मिळताजुळता असेल. कंपनी लवकरच हे फिचर्स सर्व डीवाइसेससाठी आणणार असल्याचे सांगितले जात आहे.

पर्सनल व्हॉइसचे AI असिस्टंट कसे सेट करावे

सर्वप्रथम, हे फिचर अनेबल करण्यासाठी, तुम्हाला प्रथम फोनमधील ॲपचे नवीन व्हर्जन अपडेट करावे लागेल.

स्टेप 1. ॲप्समध्ये असलेला सेटिंग्जचा टॅब उघडा.
स्टेप 2. आता Assistant settingsवर टॅप करा आणि Set Up Personal Voice या ऑप्शन वर जा.
स्टेप 3. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसणाऱ्या स्क्रीन प्रॉम्प्ट फॉलो करावा लागेल.
स्टेप 4. यानंतर तुम्हाला तुमचा आवाज रेकॉर्ड करावा लागेल. तुम्हाला डिस्प्लेवर दाखवलेले शब्द वाचावे लागतील. यानंतर आई-जनरेटेड वॉइस रिप्लिकेशन प्रोसेस पूर्ण होईल.

Source link

ai assistantAI असिस्टंटfeaturetruecallervoice
Comments (0)
Add Comment