WillCook Oven Bag एक हलकी पोर्टेबल, बॅटरी पावर्ड बॅग आहे जी मायक्रोवेव्ह सेफ आहे आणि यातील पेटंटेड कापड उष्णता निर्माण करते. यातील बिल्ट-इन रिचार्जेबल बॅटरी तुमचं जेवण फक्त 20 मिनिटांत गरम करू शकते. एकदा गरम झालेलं जेवण ही बॅग 82 डिग्री सेल्सियस पर्यंत 2 तासांसाठी गरम ठेवू शकते. त्यामुळे या बॅगचा वापर पिकीनिक, पोटलॉक किंवा ऑफिसमध्ये जाताना जेवण गरम ठेवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.
WillCook बॅग अन्न फक्त गरम ठेवत नाही तर थंड देखील ठेवू शकते. त्यामुळे जर तुम्ही उन्हाळ्यात बाहेर पडणार असाल तर तेव्हा देखील ही बॅग कामी येईल. ही स्टायलिश बॅग, ब्लॅक आणि ब्राऊन कलरमध्ये उपलब्ध आहे. यातील इन्सुलेटिंग कॉटन आणि अल्युमिनियम फिल्ममुळे ही बॅग आतील अन्न पदार्थ थंड ठेवू शकते. कंपनीनं सांगितलं आहे की ही बॅग 4 डिग्री सेल्सियस इतकं कमी तापमाना दोन ते तीन तासांसाठी मेंटेन करू शकते. असे अनेक प्रोडक्ट बाजारात आहेत जे वस्तू थंड ठेवू शकतात आणि गरज पडल्यास गरमही करू शकतात परंतु बॅग खरंच वेगळी ठरते.
अद्याप ही बॅग बाजारात उपलब्ध झाली नाही, कंपनी या बॅगची विक्री यंदा म्हणजे 2024 मध्ये सप्टेंबरमध्ये सुरु करणार आहे. या बॅगची किंमत 200 डॉलर्स असेल, ही किंमत भारतीय चलनात रूपांतरित केल्यास सुमारे 16,600 रुपये होतात. भारतात ही बॅग लाँच होण्याची शक्यता कमी आहे परंतु आयात करण्याचा पर्याय नक्की उपलब्ध असेल.