अनंतनागमध्ये मतदानादरम्यान मेहबूबा मुफ्ती यांनी का आंदोलन पुकारलं? वाचा नेमकं प्रकरण

बिजबेहरा: लोकसभेच्या सहाव्या टप्प्यातील निवडणुका शनिवारी सुरू असतानाच पीडीपीचे पक्षकार्यकर्ते आणि पोलिंग एजंटना ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप करत पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी शनिवारी जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले. तसेच, त्यांच्या मोबाइलची आऊटगोइंग सेवा बंद केल्याचा दावाही त्यांनी केला.
Bank Holiday: पहिलेच करुन घ्या महत्त्वाची कामे, जूनमध्ये बँकांना भरपूर सुट्ट्या; पाहा बँक हॉलिडेची यादी
पोलिसांनी मात्र ताब्यात घेतलेली माणसे ‘ओव्हरग्राऊंड वर्कर’ (दहशतवाद्यांचे हस्तक असल्याचा दावा करून निवडणूक सुरळीत होण्यासाठी केलेली ही प्रतिबंधात्मक कारवाई असल्याचे स्पष्ट केले आहे. अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघात मेहबुबा यांच्यासह एकूण २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कार्यकर्त्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ मेहबुबा यांनी श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील बिजबेहरा पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी जम्मू आणि काश्मीर प्रशासनाचा निषेध करून ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांची त्वरित सुटका करण्याची मागणी केली.‘आमच्या पोलिंग एजंटना लक्ष्य करून अटक करण्यात आली आहे. आम्ही त्यांना कारण विचारत आहोत, मात्र ते काहीच बोलत नाहीत. जर मी संसदेत जाण्याची त्यांना भीती वाटत असेल तर, उपराज्यपालांनी मला निवडणूक लढवू नका, असे सांगावे,’ असे मुफ्ती म्हणाल्या. रस्ता अडवणाऱ्या मेहबुबा यांच्यासह आंदोलकांना हटवण्याचे पोलिसांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. लोकांची गर्दी वाढत गेल्याने पोलिसांना किरकोळ लाठीमारही करावा लागला, असे पोलिसांनी सांगितले.

तर, या लाठीमारात प्रसारमाध्यमांचे काही प्रतिनिधी जखमी झाल्याचा दावा काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी केला. त्यांना मतदान केंद्राच्या आत जाण्यासाठी परवानगी देण्यात आली नव्हती. सुरक्षारक्षकांनी त्यांना मतदारकेंद्रापासून १०० मीटर लांब अंतरावर रोखले होते. अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त दलालाही पाचारण केले होते.

Source link

loksabha election 2024Loksabha Election newsMehbooba protest in AnatnagMehbooba protest NewsPDP workers Arrestपीडीपी कार्यकर्ते अटकेतमेहबुबा मुफ्ती आंदोलनलोकसभा निवडणूक बातमी
Comments (0)
Add Comment