व्हायरल व्हिडिओमध्ये, एबीपी न्यूजच्या अँकर चित्रा त्रिपाठी असं सांगताना दिसत आहेत, की मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात निवडणुकीपूर्वी झालेल्या एका अभ्यासादरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रं अर्थात ईव्हीएम बिघडलं. काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने याबाबतची तक्रार केली होती. यानंतर अनेक अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरुन हटवण्यात आलं. भिंड जिल्ह्यातील अटेर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी वोटर-व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) मशिनमध्ये गडबड झाली होती. व्हीव्हीपीएटी (VVPAT) मशिनमध्ये ईव्हीएमचं बटण दाबल्यानंतर मत भाजपला जात असल्याचं दाखवण्यात आलं.
इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत असं कॅप्शन देण्यात आलं, की ‘मोठी बातमी… निवडणुकीत मोठी चूक’ आणि ‘ईव्हीएममध्ये गडबड’ या कॅप्शनसह हा व्हिडिओ लोकसभा आणि निवडणूक २०२४ च्या हॅशटॅगसह शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स अर्थात आधीच्या ट्विटरवर व्हिडिओ अशा कॅप्शनने शेअर केला, की पुन्हा एकदा, ईव्हीएममध्ये गडबड असल्याचं सिद्ध झालं आहे, जसं मोदी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाहीत, त्याचप्रमाणे ते ईव्हीएमशिवाय निवडणूक जिंकू शकत नाहीत, ईव्हीएम म्हणजे प्रत्येक मत मोदींना.’
लॉजिकली फॅक्ट्स या वेबसाईटने या बातमीची चौकशी केली असता, ही घटना सात वर्षांपूर्वी घडली असून तिचा नुकत्याच होणाऱ्या किंवा आगामी निवडणुकांशी काहीही संबंध नसल्याचं समोर आलं. लॉजिकली फॅक्ट्सने व्हिडिओचा दावा नाकारला आहे. गुगल सर्चवरून समोर आलं, की व्हायरल न्यूज क्लिपचे मूळ शीर्षक ‘EVM विवादः भिंड एसपी, कलेक्टर हटाव’ होते. १ एप्रिल २०१७ रोजी एबीपी न्यूजच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर (येथे पहा) अपलोड केलं गेलं. मूळ व्हिडिओ १० मिनिटं आणि ३२ सेकंदांची आहे, तर व्हायरल व्हिडिओ केवळ १ मिनिट ३० सेकंद फुटेज कव्हर करतो.
मूळ बातमी मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात ईव्हीएम वादात जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना हटवण्याबाबत होती. इतर अनेक मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांनीही त्या काळातील बातमी कव्हर केली. याव्यतिरिक्त, मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हायरल व्हिडिओमध्ये सप्टेंबर २०२२ मध्ये एबीपी न्यूज सोडल्यानंतर आजतक हिंदी वृत्तवाहिनीसाठी काम करत आहे.
निष्कर्ष
लॉजिकली फॅक्ट्समध्ये असं आढळलं, की व्हायरल होत असलेला व्हिडिओ सात वर्षे जुना आहे आणि मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील अटेर विधानसभा मतदारसंघ आणि उमरिया जिल्ह्यातील बांधवगढ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीदरम्यान EVM मध्ये झालेल्या छेडछाडीशी संबंधित आहे. याचा ताज्या निवडणुकीशी काहीही संबंध नाही. त्यामुळे हा दावा खोटा आहे.
(This story was originally published by Logically Facts, and republished by MT as part of the Shakti Collective.)