अपघाताचा बदला घेण्यासाठी एसटी डेपोमध्ये घुसून हल्ला; अर्धा तास घातला धुडगूस

हायलाइट्स:

  • कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये धक्कादायक प्रकार
  • अपघाताचा बदला घेण्यासाठी एसटी डेपोवर हल्ला
  • अज्ञातांच्या हल्ल्यात पाच कर्मचारी जखमी, ९ एसटी बसचं नुकसान

कोल्हापूर: दोन दिवसापूर्वी झालेल्या अपघाताचा बदला घेण्यासाठी इचलकरंजी येथील एसटी आगारात घुसून अज्ञातांनी ९ एसटी व ५ दुचाकी फोडल्या. मध्यरात्री आगारात दहशत माजवत तेथील कर्मचाऱ्यांनाही बेदम मारहाण केली. या हल्ल्यात चार कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Attack on Ichalkaraji ST Bus Depot)

वाचा: अडत व्यापारी रागवायचा, काम सोडून जाताना हमालांनी केले ‘असे’ कृत्य

याबाबत अधिक माहिती अशी की, दोन दिवसापूर्वी इचलकरंजी येथील वर्धमान चौकात एसटी आणि दुचाकी यामध्ये अपघात झाला होता. या अपघातात दुचाकीवरील तिघे तरुण गंभीर जखमी झाले होते. त्यातील एका तरुणाचा काल दुपारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मृत झालेल्या तरुणांचे काही नातेवाईक व मित्रमंडळी रात्री एक वाजता शहापूर येथील एसटी आगारात घुसले. त्यांच्या हातात काठ्या होत्या. रात्री मुक्कामाला आलेल्या एसटीवर त्यांनी तुफान दगडफेक सुरू केली. काचा फोडल्या. आडवणाऱ्या सुरक्षारक्षकसह कर्मचाऱ्यास काट्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये चार कर्मचारी जखमी झाले. यामध्ये सुरक्षा रक्षक पांडुरंग आनंदा चोपडे, तसेच नवनाथ सिताराम हिप्परकर, कृष्णा सदाशिव चोपडे, सुरेश शिवाजी केसरकर हे कर्मचारी जखमी झाले आहेत.

इचलकरंजी एसटी डेपो

अर्धा तास या अज्ञात तरुणांनी आगारात प्रचंड दहशत माजवली. त्यातील दोन तरुणांना पकडून कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याबाबत शहापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.

वाचा: कोल्हापुरात खळबळ! हळदकुंकू लावलेल्या अवस्थेत आढळला बालकाचा मृतदेह

Source link

Attack on Ichalkaranji ST Bus DepotIchalkaranjiइचलकरंजीएसटी बस डेपोवर हल्लाकोल्हापूर
Comments (0)
Add Comment