Rajkot Fire | गुजरातच्या गेम झोनमध्ये भीषण आग, घटनेत २२ जणांचा मृत्यू


मुंबई
– गुजरातमधील टीआरपी गेम झोन (TRP Gaming Zone) मध्ये सांयकाळी ४ वाजता भीषण आग लागले. या घटनेत जवळपास २२ जणांनी जीव गमावला असल्याचे वृ्त्त समोर येते. अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले तर दुर्घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरु आहे अशी माहिती पोलिसांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे. युवराज सिंग सोलंकी व्यक्तीच्या नावावर हा गेम झोन असल्याची माहिती समोर येते.

बचावकार्य सुरु

सांयकाळी ४ च्या सुमारास राजकोटच्या कंट्रोलरुमला घटनेबद्दल माहिती देण्यात आली. यानंतर अग्निशामक दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक , रुग्णवाहिका तसेच पोलिसांना घटनास्थळी पाचरण करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली उशीरा रात्रीपर्यंत शोधकार्य सुरु राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
डोंबिवली MIDC स्फोटात ८ कामगारांचे मृत्यू, ६४ जण जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

गेम झोनमध्ये लागेल्या भीषण आगीत मृत्यूचा आकडा वाढू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते. आग इतकी भीषण होती की ३ किलोमीटरच्या परिसरात धूराचे लोट दिसत होते, आणि बचावकार्यात अडथळा निर्माण होत होता असे स्थानिकांकडून सांगण्यात येते. पोलिसांनी या गेम झोनचे मालक यांना कस्टडीत घेतले आहे, त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु आहे असे पोलिस आयुक्त राजू भार्गव यांनी सांगितले.
औद्योगिक क्षेत्र आणि निवासी क्षेत्र यांच्यातील बफर झोन गायब केला, आज हजारोंच्या जीवावर प्रसंग बेतला असता!

घटनेवर पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख

झालेली घटना अतिशय दुर्देवी आहे,मृताच्या कुटुंबासोबत माझ्या सहवेदना आहेत,दुर्घटनेतील जखमी लवकर बरे व्हावे यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना करुया,सरकार आणि स्थानिक प्रशासन पिडीतांना पूर्णपणे सहकार्य करेल अशी भावना पीएम मोदीं यांनी व्यक्त केली आहे. गुजरात सरकारकडून मृतांना चार लाखांची तर जखमींना ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.


गेम झोन मालक म्हणून नाव पुढे आलेल्या युवराज सिंग सोलंकी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी गुजरात पोलिसांकडूम सुरु आहे. तसेच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी घटनेवर आमचे पूर्ण लक्ष आहे,संपूर्ण यंत्रणा आम्ही कामाला लावली आहे अशी माहिती दिली, तसेच मृतांचा आकडा अजूनही निश्चित सांगता येणार नाही असे म्हटंले आहेत.

Source link

fire newsGujratgujrat playing zone firemassive firerajkoat playing zoneगुजरातगुजरात आग बातमीगुजरात बातमीप्ले झोन
Comments (0)
Add Comment