15 कोटी वर्ष जुन्या या सजीवाच्या शोधातून शास्त्रज्ञ प्राचीन सागरी जीवनाबद्दल बरेच काही शिकू शकतात. हे जीवाश्म 2018 मध्ये जर्मनीतील चुनखडीच्या खडकातून काढण्यात आले होते. शोधावर आधारित अभ्यासात, संशोधकांनी सांगितले की, ब्रिटल स्टारच्या नवीन प्रजातीतला असे करणारा हा एकमेव जीव आहे.
शरीराचे तुकडे करून हा जीव करतो प्रजनन
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, हा प्राणी स्वतःच्या शरीराचे अवयव तोडतो आणि अगदी स्वतःसारखा दुसरं जीव निर्माण करतो. लक्झेंबर्गच्या नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीमधील जीवाश्मशास्त्रज्ञ डॉ. बेन थ्यू म्हणाले, ‘काही ब्रिटल स्टार आणि स्टारफिश अतिशय वेगळ्या पद्धतीने प्रजनन करतात. या प्रक्रियेला ‘क्लोनल फ्रॅगमेंटेशन’ म्हणतात. थ्यू यांच्या मते, आपल्याला क्लोनल फ्रॅगमेंटेशनबद्दल माहिती मिळाली आहे परंतु ते कसे विकसित झाले हे अजून अद्याप आपल्याला माहित नाही. हे पहिल्यांदा कधी घडले हे देखील शास्त्रज्ञांना माहीत नाही.
जीवाश्म 15 कोटी वर्षांपासून जिवंत
सर्वात महत्त्वाचे म्हणजे शास्त्रज्ञांना क्लोनिंग प्रथम केव्हा विकसित झाली ने नक्की माहीत माहित नाही. हा १५ कोटी वर्ष जुना जीवाष्म वर्ष इतक्या चांगल्या प्रकारे क्लोनिंग करून पुन्हा तयार झाला आहे की त्याच्या शरीराचे नवीन अवयव दिसू शकतात. टेरी प्रॅचेटच्या डिस्कवर्ल्ड कादंबरीतील एका सुपर कॉम्प्युटरच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे, हे एक मशीन जे अकल्पनीय विचार करू शकते.
निसर्ग स्वतः खूप रहस्यमयी आहे. सागरी संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना आजही समुद्रात असे प्राणी सापडत आहेत जे यापूर्वी कधीही दिसले नव्हते आणि त्यांच्याबद्दल कोणतीही नोंद नाही. त्याचप्रमाणे, पृथ्वीच्या इतिहासात असे बरेच प्राणी असावेत, ज्यांच्याबद्दल आपल्याला अद्याप माहिती नाही.