मृत्यूचा पाळणा! बेबी केअर सेंटरमध्ये भीषण आग, ७ नवजात बाळांचा मृत्यू, ५ व्हेंटिलेटरवर

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीच्या विवेक विहार येथील एका बेबी केअर रुग्णालयात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत ७ नवजात बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही आग शनिवारी रात्री साडे ११ वाजताच्या जवळपास लागल्याची माहिती आहे. काहीच क्षणात आगीच्या ज्वाळा बाहेरपर्यंत दिसू लागल्या. घटनास्थळी तात्काळ ९ अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या, त्यांनी बेबी केअर रुग्णालयातील बाळांना सुखरुप बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाच्या जवानांनी १२ बाळांना बाहेर काढलं. पण, उपचारादरम्यान त्यापैकी ७ जणांचा मृत्यू झाला तर ५ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. ही आग का लागली याची सध्या काहीही माहिती नाही.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना रात्री ११.३२ वाजता विवेक विहारच्या ब्लॉक बी, आयटीआयजवळील बेबी केअर सेंटरमध्ये आल लागल्याची माहिती मिळाली, त्यानंतर ९ गाड्यांना घटनास्थळी पाठवण्यात आलं. यादरम्याव १२ नवजात बाळांना वाचवण्यात आलं.
शनिवारची सुट्टी अन् ९९ रुपयांची स्किम, राजकोटमध्ये गेमिंग झोनला आग, २७ जणांच्या मृत्यूची भयंकर कहाणी
दिल्लीच्या अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, या बेबी केअर सेंटरच्या पहिल्या मजल्यावरुन १२ बाळांना वाचवण्यात आलं. मात्र, ७ बाळांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर ५ बाळांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.

या बेबी केअर सेंटरच्या बाजुच्या इमारतीतही आग लागली पण सुदैवाने तिथे जिवीतहानी झाली नाही. बेबी केअर सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन सिलेंडर असल्याचीही माहिती आहे. यापैकी काही ऑक्सिजन सिलेंडर फुटले देखील. ५० मिनिटांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं.

Source link

baby care centre In Vivek ViharDelhi Fire At baby care centerdelhi newsFire in baby care centreinfants died in DelhiVivek Vihar baby care centre fireदिल्ली आगदिल्ली बातम्या मराठी बातम्याबेबी केअर सेंटरमध्ये आग
Comments (0)
Add Comment