म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ५८ जागांसाठी शनिवारी ५९.१४ टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७८.१९ टक्के, तर जम्मू-काश्मीरमध्ये सर्वांत कमी ५२.२८ टक्के मतदानाची नोंद झाली. दिल्लीतील सात जागांसाठी ५४.५२ टक्के मतदान झाले.सहाव्या टप्प्यात दिल्लीतील ७, उत्तर प्रदेशातील १४, बिहार व पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ८, हरियाणातील १०, झारखंडमधील ४, ओडिशातील ६ आणि जम्मू-काश्मीरमधील एका जागेवर मतदान झाले. सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात उर्वरित ५६ जागांसाठी १ जूनला मतदान होणार असून, ४ जूनला मतमोजणी होणार आहे.
सहाव्या टप्प्यातील मतदानादरम्यान, जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग-राजौरी येथे ‘ईव्हीएम’मध्ये फेरफार केल्याचा आणि मोबाइलचे ‘आऊटगोइंग कॉल’ ब्लॉक केल्याचा आरोप करून ‘पीडीपी’च्या उमेदवार मेहबूबा मुफ्ती यांनी मतदान केंद्राबाहेर धरणे धरले.राज्य मतटक्का
सहाव्या टप्प्यातील मतदानादरम्यान, जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग-राजौरी येथे ‘ईव्हीएम’मध्ये फेरफार केल्याचा आणि मोबाइलचे ‘आऊटगोइंग कॉल’ ब्लॉक केल्याचा आरोप करून ‘पीडीपी’च्या उमेदवार मेहबूबा मुफ्ती यांनी मतदान केंद्राबाहेर धरणे धरले.
राज्य मतटक्का
बिहार : ५३.५०
हरयाणा : ५८.४४
जम्मू-काश्मीर : ५२.२८
झारखंड : ६२.८७
दिल्ली : ५४.६३
ओडिशा : ६०.०७
उत्तर प्रदेश : ५४.०३
पश्चिम बंगाल : ७८.१९