अनेक भारतीय भाषा बोलू शकतील हे AI
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या एका प्रेस स्टेटमेंटनुसार, दोन नवीन एआय अँकरना AI क्रिश आणि AI भूमी असे नाव देण्यात आले आहे. रविवारी चॅनलचा नववा वर्धापन दिन साजरा होत असताना ही जोडी पहिल्यांदाच डीडी किसानवर दिसणार आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हे अँकर पन्नास भारतीय आणि परदेशी भाषा बोलू शकतात.
मंत्रालयाने एआय अँकरचा संगणक म्हणून परिचय करून दिला जो मनुष्यासारखा दिसू शकतो आणि कार्य करू शकतो. त्यात पुढे असेही म्हटले आहे की एआय क्रिश आणि एआय भूमी ब्रेक न घेता किंवा थकल्याशिवाय 24 तास आणि 365 दिवस बातम्या वाचू शकतात.
डीडी किसान चॅनलच्या या कार्यक्रमांमध्ये दिसतील हे AI अँकर
डीडी किसान चॅनल नवीनतम कृषी संशोधन, कृषी बाजारातील ट्रेंड, हवामानातील बदल आणि सरकारी योजनांशी संबंधित राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर बातम्या आणि माहिती शेअर करते. चॅनेलच्या काही लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये कृषी दर्शन, मंडी खबर, मौसम खबर आणि चौपाल चर्चा यांचा समावेश आहे.
AI अँकर हे कंप्यूटर-जनरेटेड डिजिटल अवतार आहेत जे मानवांसारखे दिसतात. हे अवतार विविध AI तंत्रज्ञानावर चालतात जे त्यांना टेक्स्ट-टू-व्हॉइस कंटेंट निर्माण करण्याची तसेच ओठ, डोळा, डोके आणि हाताच्या हालचाली बोलल्या जाणाऱ्या शब्दांशी सिंक करण्याची परवानगी देतात.
DD Kisan वर क्रिश आणि भूमीचे लॉन्चिंग हा भारताच्या प्रसारण इतिहासातील एक ऐतिहासिक क्षण आहे, कारण AI अँकरना स्वीकारणारे हे चॅनल पहिले सरकारी टीव्ही चॅनल बनले आहे.