तर आतमध्ये खेळानुसार बॉक्स तयार करण्यात आले होते. या बॉक्समध्ये जाण्यासाठी प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी एकच गेट होते. तो काच फोडून गेम झोनमधून बाहेर आला. गेम झोनमध्ये आग लागली तेव्हा बॉलिंग बॉक्स पूर्णपणे खचाखच भरलेला होता. काही लोकांनी आग लागल्याचं सांगत आरडाओरड केली. अग्निशमन यंत्राने आग विझवली जाईल असं वाटत होते, मात्र गेम झोनमधील लाइट गेल्याने परिस्थिती गंभीर असल्याचे समजलं. त्यावेळी बॉलिंग बॉक्समध्ये उपस्थित २० जणांच्या फुफ्फुसात आगीचा धूर भरला होता. तो कसा बसा पळून जाण्यात आणि जीव वाचवण्यात यशस्वी ठरला.
गेम झोनच्या कर्मचाऱ्यांनी लोकांना मदत केली का? असं विचारलं असता त्याने सांगितले की, परिस्थिती पाहून मी स्वतः घाबरलो होतो. प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी एकच गेट असल्याचे त्याने सांगितले. त्याने दिलेल्या माहितीनुसार गेटच्या बाजूला रबरी ट्युब होती. तापमान अधिक झाल्याने ते वितळून तिथे चिपकून गेले होते. त्यामुळे हे दारेही लॉक झाले होते. ते तोडून बाहेर पडावे लागले. त्याच्या फुफ्फुसात धूर भरला होता. बॉलिंग बॉक्समध्ये उपस्थित असलेल्या २० लोकांपैकी सर्वचजण बाहेर पडू शकले नाहीत. ते तिथेच अडकून पडले.
गेमिंग झोनच्या खालच्या भागात आग लागली होती तिथे लाकूड व पेट्रोलचे डबे पडलेले होते. तसेच, तिथे आणखी काही खेळांच्या बांधकामाचं सुरु होतं. आग सर्वप्रथम लाकडांमध्ये लागली, त्यानंतर आगीने रौद्र रुप धारण केलं. खाली गो-कार्ट झोन आणि वर बॉलिंग झोन होता. बॉलिंग झोनजवळ वेल्डिंगचे कामही सुरू होते, अशीही माहिती त्याने दिली.
गेमिंग झोनमध्ये काम सुरु असताना स्किम ठेवून इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना प्रवेश का देण्यात आला असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. या घटनेत आतापर्यंत ३३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.