‘मृत्यूच्या अटीं’वर ग्राहकांच्या सह्या; २७ जणांचा जीव घेणाऱ्या गेमिंग झोनचा फॉर्म समोर

राजकोट: गुजरातमधील राजकोट शहरात असलेल्या टीआरपी गेम झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत २७ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. यादरम्यान राजकोट गेमिंग झोनचं एक पत्र समोर आलं आहे. गेमिंग झोनमध्ये जाणाऱ्या लोकांकडून एका अर्जावर स्वाक्षरी घेतली जायची. हे पत्र आता सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

टिआरपी गेमिंग झोनमध्ये येणाऱ्या लोकांकडून अटी, शर्ती असलेला अर्ज भरुन घेतला जायचा. त्यातील अटी महत्त्वाच्या आहेत. ‘मी सगळी जोखीम आणि धोके आणि त्यामुळे होणाऱ्या गंभीर शारीरिक इजा, मृत्यू, संपत्तीचं नुकसान स्वीकार करतो. मला आणि माझ्या मालमत्तेला होणारं नुकसान, शारीरिक जखमा होण्याची जोखीम स्वीकारतो, याच मृत्यूचाही समावेश आहे,’ अशा अटी, शर्तींचा समावेश टिआरपी गेमिंग झोनच्या अर्जात आहे. या अर्जावर स्वाक्षरी केल्यानंतरच गेमिंग झोनमध्ये एन्ट्री दिली जायची.
Pune Car Accident: ‘ती’ कार गिफ्ट दिलेली, आजोबांनी फोटो WhatsApp ग्रुपवर टाकलेला; मित्रानं गुपितं फोडली
टिआरपी गेमिंग झोनमध्ये घडलेली घटना अतिशय भयंकर आहे. मृतांची ओळख पटण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे डीएनए सॅम्पल्स घेतले जात आहेत. या गेमिंग झोनला अग्मिशमन विभागाची परवानगी मिळालेली नव्हती. दुर्घटना घडली त्यावेळी गेम झोनमध्ये १५०० ते २००० लीटर डिझल होतं. गेम झोनमध्ये लागणाऱ्या जनरेटरसाठी हे डिझेल ठेवण्यात आलेलं होतं. याशिवाय गो कार रेसिंगसाठी १००० ते १५०० लीटर पेट्रोल ठेवण्यात आलेलं होतं. आग वेगानं पसरत गेली. जवळपास संपूर्ण गेमिग झोनला तिनं कवेत घेतलं. गेम झोनमध्ये जाण्यास आणि तिथून बाहेर पडण्याचा मार्ग एकच होता. तो केवळ ६ ते ७ फूट रुंदीचा होता.
Pune Porsche Accident: अपघातापूर्वी आरोपी मुलाचा चालकाशी वाद अन् अगरवालला कॉल; ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलेलं?
ज्या दिवशी टिआरपी गेम झोनमध्ये आग लागली, त्यावेळी तिथे ९९ रुपयांत एन्ट्रीची स्कीम सुरु होती. त्यामुळे लोक मोठ्या संख्येनं झोनमध्ये पोहोचले. लहान मुलांची संख्या मोठी होती. सध्या शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागलेल्या असल्यानं गेमिंग झोनमध्ये शाळकरी मुलांची गर्दी होती. या घटनेनंतर राजकोटचे पोलीस आयुक्त राजू भार्गव यांनी शहरातील सगळे गेमिंग झोन बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

Source link

rajkot firerajkot game zonerajkot gaming zoneराजकोट आगराजकोट गेम झोनराजकोट गेमिंग झोन
Comments (0)
Add Comment