Monday Remedies In Marathi :
हिंदू धर्मात सोमवारी महादेवाची पूजा करण्याची प्रथा आहे. सोमवार हा भगवान शंकराचा दिवस मानला जातो. या दिवशी शंकराला प्रसन्न करण्यासाठी व्रत आणि मनोभावे उपासना केल्याने इच्छित फलप्राप्ती होते.
हिंदू धर्मात सोमवारी महादेवाची पूजा करण्याची प्रथा आहे. सोमवार हा भगवान शंकराचा दिवस मानला जातो. या दिवशी शंकराला प्रसन्न करण्यासाठी व्रत आणि मनोभावे उपासना केल्याने इच्छित फलप्राप्ती होते.
भगवान शंकराची अनेक रुपे आहेत. त्यांना महादेव असेही म्हटले जाते. समुद्रमंथातून निर्माण झालेले विष प्यायल्यानंतर कंठात साठविल्यामुळे त्यांचा गळा निळ्या रंगाचा झाला म्हणून त्यांना निलकंठ या नावाने ही ओळखले जाते.
शंकराला प्रसन्न करण्यासाठी सोमवारी सकाळी स्नान करुन भगवान शिव आणि माता पार्वतीची विधिवत पूजा करावी. तसेच शिवचालीसाचे पठण करावे. शिवचालीसाचे पठण केल्यानंतर जीवनात सुख-समृद्धी येते. तसेच सर्व दु:ख दूर होतात.
1. शंकराला प्रसन्न करण्यासाठी करा हे उपाय
- शंकराला प्रसन्न करण्यासाठी सोमवारी कच्चा तांदळासोबत तीळ दान केल्याने पितृदोष दूर होतो. तसेच घरात सुख-समृद्धी नांदते. तसेच सोमवारी दीपदान केल्याने सगळ्या मनोकामना पूर्ण होतात.
- सोमवारी सकाळी स्नान केल्यानंतर पांढरा, हिरवा, पिवळा, लाल किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करावे. हे रंग शंकाराच्या आवडीचे मानले जातात.
- सोमवारी उसाच्या रसाने शंकराच्या पिंडीवर अभिषेक केल्यास वैवाहिक जीवनात आनंद येईल. तसेच नात्यातील प्रेम वाढेल. भगवान शंकराला पांढरे चंदन आणि खीर अर्पण करणे शुभ मानले जाते.
- भगवान शंकराला तांदूळ अर्पण करावे. सोमवारी दही, पांढरे वस्त्र, दूध आणि साखर दान करणे शुभ मानले जाते. यामुळे भोलेनाथ प्रसन्न होतात.
- पैशांची कमतरता दूर करण्यासाठी सोमवारी शिवरक्षा स्तोत्राचे पठण करा. कुंडलीनुसार ज्या लोकांवर चंद्राचा प्रभाव असतो त्या लोकांनी पांढरे वस्त्र परिधान करावे. इतकेच नाही तर कपाळावर चंदनाचा टिळा लावावा.
- दर सोमवारी भगवान शंकराच्या पिंडीवर अक्षता, चंदन, धूप, दुध, गंगाजल आणि बेलपत्राचा अभिषेक करावा. याने शंकराचा आशीर्वाद मिळतो. तसेच अपूर्ण इच्छा पूर्ण होतात.
- भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी सोमवारी महामृत्युंजय मंत्राचा १०८ वेळा जप केल्याने भगवान शंकाराचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच कच्चा गाईचे दूध शिवलिंगावर अर्पण करणे देखील शुभ मानले जाते.
टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.