Vastu Tips : या वेळी चुकूनही करु नका पैशांची देवाण-घेवाण, उभा राहिल कर्जाचा डोंगर

Vastu Tips for Money:

वास्तुशास्त्र हे हिंदू धर्मातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मानली जाते. घर बांधण्यापासून ते घरात कोणत्या दिशेला कोणत्या वस्तू ठेवायचा, कामाच्या ठिकाणी वास्तु नियमांची काळजी घेतली तर अनेक संकटांपासून आपण दूर राहू शकतो.

वास्तुशास्त्रामध्ये व्यवहाराशी संबंधित काही नियम सांगण्यात आले आहेत. ज्यांची काळजी घेतल्यास व्यक्तीला नुकसान सहन करावे लागत नाही. दिवसभरातील प्रत्येक वेळ ही आपल्या कोणत्याही कामासाठी चांगला व वाईट परिणाम देत असते.
Vastu Tips: सूर्यास्तानंतर या चुका करु नका, अन्यथा व्हाल कंगाल! जाणून घ्या वास्तुशास्त्रातील नियम
हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला पूर्वीपासून महत्त्व आहे. परंतु, त्याचे काही नियमही पाळणे आपल्याला अधिक गरजेचे आहे. वास्तुनुसार घराची दिशा ठरवली जाते. तसेच कर्जातून सुटका होण्यासाठी आपण पैशांची तिजोरी कोणत्या बाजूला असायला हवी हे देखील आपण ठरवतो. परंतु, वास्तुशास्त्रानुसार नकळत काही गोष्टी केल्यातर आर्थिक चणचण भासू लागते.

बरेचदा असे होते की, आपण कर्ज किंवा व्याजावर दिलेले पैसे देऊनही त्यांचा हिशोब जुळत नाही. एक गेल्यानंतर पुन्हा आर्थिक प्रश्न आपल्यासमोर उभा राहातो. आपल्यापैकी अनेकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचे असते. वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्याकडे कमावेला पैसा उरत नसेल आणि कर्जाचा डोंगर उभा राहात असेल तर काही गोष्टींची वेळीच काळजी घेणं गरजेच आहे.

1. वास्तुशास्त्रातील हे नियम लक्षात ठेवा

वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी किंवा सुर्योद्यानंतर कधीही पैशांची देवाण-घेवाण करु नका. तसेच या काळात कोणालाही कर्ज देऊ नका आणि घेऊ पण नका. शास्त्रानुसार ब्रह्म मुहूर्तावर पैशांचे व्यवहार चांगले मानले जात नाहीत.
असे म्हटले जाते की, ब्रह्म मुहूर्त आणि सूर्यास्तानंतर केलेल्या व्यवहारामुळे व्यक्तीचे आर्थिक नुकसान होते. पैसा कधीही हातात राहत नाही, हा काळ देवी लक्ष्मीच्या संक्रमणाचा काळ मानला जातो. अशावेळी केलेल्या व्यवहारांमुळे देवी लक्ष्मीचा कोप होऊ शकतो. ज्यामुळे व्यक्तीला आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो.
पैशांचे व्यवहार किंवा त्यासंबंधित असणारे काम नेहमी सूर्योदयापूर्वी किंवा सकाळीच करायला हवे. हिंदू धर्मात सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वीचा काळ हा पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी अशुभ मानला जातो.

टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

Vastu RulesVastu TipsVastu Tips For MoneyVastu Tips For SuccessVastu Tips For Wealthवास्तु टीप्सवास्तुचे नियमवास्तुशास्त्र
Comments (0)
Add Comment