Rahul Against Modi: मोदींनी देवाची कथा का काढली माहिती? अदानींवरुन राहुल गांधींनी मोदींना पुन्हा घेरले

पाटणा : ‘नरेंद्र मोदींनी देवाची कथा का काढली आहे माहीत आहे का? निवडणुकीनंतर जेव्हा हेच ईडीचे लोक नरेंद्र मोदीजींना अदानीबद्दल विचारतील. तेव्हा मोदी म्हणतील मला माहित नाही, देव तसं म्हणाला होता.’ अशा शब्दांत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.

काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी बिहारच्या बख्तियापूरमधील एका जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, ‘पंतप्रधान देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्नात आहेत, पण ते रोजगाराच्या मुद्द्यावर मौन बाळगून आहेत.’

दरम्यान पंतप्रधान मोदींनी नुकताच केलेल्या साक्षात्काराच्या भाषेवर खोचक टीका करत राहुल गांधी म्हणाले, ‘पीएम मोदी दैवी सिद्धांत घेऊन पुढे आले आहेत. देवाची ही कथा का काढली आहे माहीत आहे का? निवडणुकीनंतर जेव्हा हेच ईडीचे लोक नरेंद्र मोदीजींना अदानीबद्दल विचारतील. तेव्हा नरेंद्र मोदी म्हणतील मला माहित नाही, देव तसं म्हणाला होता.’
Cyclone Remal: रेमल चक्रीवादळाचा पश्चिम बंगालला तडाखा; बांगलादेशात ७ मृत्युमुखी, दीड कोटी लोक अंधारात
यासोबतच राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना बेरोजगारीच्या मुद्यावरुन देखील घेरले, ‘सर्वप्रथम तरुणांना सांगा की तुम्ही भारतातील तरुणांना किती रोजगार, किती नोकऱ्या दिल्या? दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे तुम्ही बोलले होते. तुम्ही एकाही तरुणाला नोकरी दिली नाही. भारतात तरुणांना रोजगार मिळू शकत नाही.’ गांधी पुढे म्हणाले, पूर्वी तुमच्याकडे नोकरीसाठी वेगवेगळे मार्ग होते, तुम्ही सैन्यात जाऊ शकत होता, तुम्ही सार्वजनिक क्षेत्रात जाऊ शकत होता, तुम्हाला खाजगी क्षेत्रात रोजगार मिळू शकत होता. नरेंद्र मोदींनी नोटाबंदी आणि जीएसटी लागू करून रोजगाराचे मार्ग बंद केले आणि सैन्यात अग्निवीर लागू करून सैनिकांना मजूर बनवून ठेवले आहे.’
याआधीही केलाय, भविष्यातही करु; धर्माधारित निवडणूक प्रचारावर अमित शाह रोखठोक बोलले
‘भाजप भारतीय संविधान टप्प्याटप्प्याने संपुष्टात आणण्याच्या विचारात आहे, अशा सर्वच प्रयत्नांना इंडिया आघाडी विरोध करणारच. राजा-महाराजांना काँग्रेसने हद्दपार केले होते, पण अंबानी आणि अदानी यांच्या बरोबरीने भाजप आता नव्याने पुढे आली आहे.’ अशी टिप्पणी देखील राहुल गांधींनी केली.

अग्नीवीर योजनेच्या माध्यमातून मोदी सरकारने भारतीय सैनिकांना मजूर बनवले आहे, हे सारेच जाणतात. आम्ही अग्निवीर रद्द करू आणि पूर्वीप्रमाणेच प्रक्रिया ठेवू, असे देखील राहुल गांधी म्हणाले.

Source link

bjpCongresscongress leaderdivine remarksNarendra ModiPM ModiRahul Gandhiअदानीकाँग्रेसकाँग्रेस नेतेनरेंद्र मोदीराहुल गांधी
Comments (0)
Add Comment