केजरीवाल ED कोठडीत असतानाच त्यांचे वजन साधारण ७ किलो घटल्याचे आप कडून सांगण्यात येते. केजरीवाल सध्या जरी जामीनावर बाहेर असले तरी त्यांचे वजन वाढत नाही ही चिंतेची बाब आहे असे आप कडून सांगण्यात येते. प्राथमिक तपासणीत शरीरात किटोन वाढले असे डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे. केजरीवाल यांना डॉक्टरांनी आणखी काही टेस्ट करण्याचा सल्ला दिला आहे ज्यामध्ये केजरीवाल यांचे पूर्ण बॉडी चेकअप केले जाईल. या तपासणीसाठी अतिरिक्त वेळ लागू शकतो याच धर्तीवर केजरीवालांकडून याचिका करण्यात आली.
अरविंद केजरीवाल यांना कॅन्सरचा धोका
केजरीवाल यांची प्रकृती सातत्याने ढासळते, त्यांना डॉक्टरांनी PET – CT Scan करायला सांगितले असून त्यांच्या वजनात कमालीची घट झाले तसेच शरीरात keton ची मात्रा सुद्धा वाढले त्यामुळे केजरीवालांना किडनी किंवा कॅन्सर संदर्भांत गंभीर आजार होण्याचा धोका असू शकतो ही भीती आम आदमी पार्टींनी वर्तवली आहे. ‘आप’च्या सोशल मीडियावर याबाबत विधान पोस्ट करण्यात आले आहे.
अरविंद केजरीवाल अटक प्रकरण
दिल्लीच्या कथित दारु घोटाळा प्रकरणात केजरीवाल यांना इडीकडून नऊ वेळा समन्स जारी करण्यात आला, पण केजरीवाल ईडीसमोर सतत गैरहजर राहिल्याने इडीने थेट अटक वॉरंट जारी करत, केजरीवाल यांना २१ मार्चला अटक केली. जवळपास एक ते सव्वा एक महिन्यानंतर केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला. सध्या केजरीवाल १ जूनपर्यंत जामीनावर बाहेर आहेत, येत्या २ जूनला केजरीवालांना कोर्टासमोर हजर राहाण्याचे आदेश देण्यात आलेत. आता केजरीवालांच्या मुदत वाढीच्या याचिकेवर कोर्ट काय निकाल देते हे पाहणे उत्सुकतेचे असेल.