यापूर्वी, शास्त्रज्ञांचा असा विश्वास होता की निअँडरथल्स नष्ट होण्यात काही व्हायरेसेसने महत्त्वाची भूमिका बजावली असावी. पण यासाठी संशोधकांकडे कोणताही ठोस पुरावा नव्हता. हजारो वर्षांपूर्वीच्या या सांगाड्यातून डीएनए काढून तपासणे ही शास्त्रज्ञांसाठी अत्यंत आव्हानात्मक गोष्ट होती. जीवशास्त्रज्ञ मार्सेलो ब्रिओनेस यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले आहे. रशियातील चागिरस्काया गुहेत सापडलेल्या निएंडरथल सांगाड्यांच्या डीएनए सॅम्पल्सचे परीक्षण करण्यात आले आहे.
हाडांमध्ये आढळले व्हायरसचे सॅम्पल्स
ब्रायोन्सच्या टीमला हाडांमध्ये काही तुकडे आढळून आले जे आजच्या युगातील तीन व्हायरेसशी जुळतात. यामध्ये एडेनोव्हायरस (कॉमन कोल्ड), हर्पीज वायरस (कोल्ड सोर) आणि पॅपिलोमाव्हायरस (जेनिटल वार्ट्स) यांचा समावेश आहे.
शास्त्रज्ञांचा हा शोध सध्या पहिल्या स्टेजमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. हाडांच्या तुकड्यांमध्ये आढळलेल्या या व्हायरसचा थेट परिणाम निअँडरथल्सवर झाला असेल का? हे नक्की सांगत येणार नाही. मात्र या शोधामुळे पुढील तपासाची दारे खुली झाली आहेत. तसेच, निअँडरथल्सच्या नष्ट होण्याचे कारण पर्यावरणातील बदल हे आहेत. या थेरीवर या शोधामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
निअँडरथल्सच्या नामशेष होण्यामागे अनेक घटकांचा सहभाग असावा हेही संशोधकांनी आवर्जून सांगितले आहे. या व्हायरसचा आणि हाडांमध्ये सापडलेल्या इतर घटकांचा अभ्यास आपल्याला सत्याच्या अधिक जवळ नेईल.
सांगाड्याच्या परीक्षणातून मिळाली ही माहिती
निअँडरथल्सची मिळालेली ही कवटी दोन सेंटीमीटर किंवा 0.7 इंच सपाट असल्याचे आढळून आले. त्यावर काही दगड पडल्याने ही सपाट झाल्याचा प्रकार घडल्याचे मानले जात आहे. या सांगाड्याचा शरीराचा खालचा भाग 1960 मध्ये बाहेर काढण्यात आल्याचे मानले जाते. हा शोध अमेरिकन पुरातत्वशास्त्रज्ञ राल्फ सोलेकी यांनी लावला आहे.