भाजपला किती नुकसान होणार?
योगेंद्र यादव यांच्या दाव्यानुसार सातव्या टप्प्यात बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपला नुकसान होवू शकते. सत्तास्थापनेसाठी लागणाऱ्या २७२ जागांपेक्षाही कमी जागांवर भाजपला यश मिळेल अशी शक्यता यादवांनी वर्तवलीय. भाजपच्या मित्रपक्षांना ३५ ते ४५ जागांवर यश मिळेल तर भाजप साधारण २४० ते २६० जागांवर जिंकेल असा दावा यादवांनी केला आहे. तर दक्षिणातील राज्यातून भाजपला दोन ते चार जागांची वाढ होवू शकते असा अंदाज यादवांनी बोलून दाखवलाय. २०१९ मध्ये भाजपला ३०३ जागांवर यश मिळाले होते पण आता त्याहून अधिक भाजपने चारशे पारचा नारा दिलाय.
काँग्रेसला किती जागांवर फायदा होणार?
इंडिया आघाडी म्हणून एकजूट असलेल्या विरोधकांना साधारण २०० ते २३५ जागांवर यश मिळेल अशा यादवांना अंदाज आहे. काँग्रेस एकटे साधारण ७० ते १०० जागांवर जिंकून येईल असा विश्वास यादवांनी बोलून दाखवलाय तर काँग्रेससोबत गेलेले मित्रपक्ष १२५ ते १३५ जागांवर जिंकून येण्याची शक्यता यादवांनी बोलून दाखवलीय. साधारण काँग्रेस आणि मित्रपक्ष भाजपला काटे की टक्कर देवू शकतात असा अंदाज यादवांना वाटतोय.
महाराष्ट्रात नेमके गणित काय?
राज्यात सध्या महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगलेला दिसतोय. पाच टप्प्यात झालेल्या मतदानात मतदारांचा मतदानांसाठी प्रतिसाद मात्र अल्प पाहायला मिळालाय. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपला आणि सेना मिळून साधारण ४२ जागांवर यश मिळाले होते पण यंदा धक्कादायक निकाल येवू शकतो असा अंदाज यादवांनी बोलून दाखवलाय. यंदा भाजपला साधारण १५ जागांवर नुकसान होईल म्हणजेच ठाकरेंची सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बाजूने जास्त जागा जाण्याची शक्यता आहे.