आपल्या आजूबाजूला अनेक मोबाईल रिपेअरिंगची दुकाने उघडली आहेत. स्मार्टफोनचा वापर वाढत असल्याने त्यांच्या नुकसानीचा धोकाही वाढत आहे. जेव्हा फोन खराब होतो, तेव्हा लोक मोबाइल रिपेअरिंगच्या दुकानात जातात, परंतु अनेक वेळा दुकानदार पार्ट्ससाठी अव्वाच्या सव्वा किंमती सांगतात. मात्र इतके असूनही लावण्यात येणाऱ्या फोन पार्ट्सचे स्पेसिफिकेशन्स बरोबर आहेत की नाही ते कळत नाही.
अशा प्रकारे दुकानदार करू शकतात तुमची फसवणूक
- बिघाड झालेले पार्ट्स: मोबाईलच्या पार्ट्समध्ये बिघाड झाल्यास दुकानदार त्याठिकाणी जुने पार्ट्स बसवून तुमची फसवणूक करू शकतात.
- अनावश्यक रिपेअरिंग: दुकानदार अनेकदा मुद्दाम मोबाईलमध्ये बिघाड असल्याचे सांगतात व ग्राहकांकडून जास्त पैसे चार्ज करतात.
- जास्त पैशांची मागणी: पार्ट्स आणि सर्विससाठी ते तुमच्याकडून जास्त पैशांची मागणी करतात
- डेटाची चोरी: ते तुमच्या मोबाईलमधील डेटाची चोरी करू शकतात.
पार्ट्सची योग्य किंमत कशी जाणून घ्यावी?
स्मार्टफोनच्या पार्ट्सच्या नेमक्या किंमतीबद्दल माहिती मिळवणे थोडे कठीण आहे. जर तुम्हाला माहित असेल की तुमच्या फोनच्या काही ठराविक पार्टमध्ये अडचण आहे, तर या पार्टची किंमत आधी जाणून घ्या. जर तुम्हाला किंमत शोधण्यात अडचण येत असेल तर तुम्ही काही वेबसाइटची मदत घेऊ शकता. या वेबसाइट्स तुम्हाला पार्ट्सच्या किमतींची माहिती देतात.
Maxbhi.com हे एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे जे तुम्हाला मोबाईल पार्ट्सच्या किमतीबद्दल माहिती देते. तुम्ही येथे विविध ब्रँड आणि मॉडेल्सच्या पार्ट्सच्या किमती पाहू शकता. याशिवाय XParts.IN ही एक वेबसाइट आहे जिथून पार्ट्सची किंमत कळू शकते.