याआधीही केलाय, भविष्यातही करु; धर्माधारित निवडणूक प्रचारावर अमित शाह रोखठोक बोलले

नवी दिल्ली : मुस्लिम आरक्षणाविरोधात प्रचार, समान नागरी संहिता लागू करणे हा जर धर्माधारित निवडणूक प्रचार आहे, तर तसा प्रचार भाजपाने याआधीही केलाय आणि भविष्यातही करणार, असे रोखठोक मत केंद्रीय मंत्री अमित शाहांनी व्यक्त केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत विरोधक भाजपावर करत असलेल्या ‘धर्माधारित निवडणूक प्रचारा’च्या आरोपावर प्रत्युत्तर दिले आहे. अमित शाह म्हणाले, ‘मुस्लिम आरक्षणाला विरोधात प्रचार करणं, कलम ३७० हटवणं, समान नागरी कायदा लागू करणं याआधारे जर मतदारांपर्यंत पोहोचणं हा जर धर्माधारित निवडणूर प्रचार असेल तर भाजपाला असं याआधीही केलंय आणि भविष्यातही करत राहणार.’ तर येत्या पाच वर्षांच्या आत आमचं सरकार देशभरात समान नागरी कायदा लागू करणार असल्याचा दावा देखील केला आहे.
One Nation One Election : पुढील कार्यकाळात एक देश एक निवडणुकीची अंमलबजावणी, अमित शहांची घोषणा
२०२३ मधील संसदेच्या पावसाळी अधिवेशनात समान नागरी कायद्याचे विधेयक मांडले गेले होते. तसेच समान नागरी कायदा आणण्यास भाजपा पक्ष कटिबद्ध असल्याचे देखील अमित शाहांनी वारंवार वक्तव्य केले होते. याच पार्श्वभूमीवर आता अमित शाहांनी आपल्या पक्षाच्या येत्या पाच वर्षांच्या कार्यकाळात समान नागरी कायदा लागू करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
वर्क फ्रॉम होम ऐकलं होतं, वर्क फ्रॉम जेल पहिल्यांदाच पाहिलं, भाजपच्या बड्या नेत्याचा केजरीवालांवर हल्लाबोल
यासोबतच अमित शाह यांनी ‘एक देश, एक निवडणूक’ लागू करणार असल्याचेही म्हटले आहे. ‘पंतप्रधानांनी नियुक्त केलेल्या रामनाथ कोविंद समितीचा अहवाल सादर करण्यात आला असून आता देशात एकाच वेळी निवडणुका घेण्याची वेळ आली असल्याचे केंद्रीय मंत्री म्हणाले आहेत.

Source link

amit shahbjpindia alliancemodi sarkarone nation one electionreligion-based campaigninguccunion ministerअमित शाहएक देश एक निवडणूककेंद्रीय गृहमंत्रीसमान नागरी कायदा
Comments (0)
Add Comment