अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यास अडचण
शाळा डोंगराळ भागात असल्यामुळे अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यात अडचण येत होती. पण तरीही स्थानिक नागरिकांच्या मदतीने अडचणीचा सामना करून अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
शॉर्ट सर्किटमुळे लागली आग
हरिपूर रेस्क्यू विभागाचे अधिकारी फराज जलाल यांनी घटनेबाबतची अधिक माहिती दिली आहे. ते म्हणाले की, ” शाळेला आग लागली तेव्हा सुमारे १,४०० मुली शाळेत होत्या. त्या सर्वांना शाळेच्या इमारतीतून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. लागलेल्या आगीत शाळेच्या इमारतीचे पूर्णपणे नुकसान झालं. शाळेची अर्धी इमारत लाकडाची असल्यामुळे जवळ जवळ सगळीच इमारत जळून गेली आहे.”
शाळा लवकरच सुरू करण्यात येईल
खैबर पख्तूनख्वाचे मुख्य सचिव नदीम अस्लम चौधरी यांनी शाळेच्या इमारतीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती दिली असून या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर शाळा लवकरच सुरू करण्यात येईल असं चौधरी यांनी म्हंटलं आहे
खैबर पख्तूनख्वा हा अशांत प्रदेश
खैबर पख्तूनख्वा हा पाकिस्तानमधील एक अशांत राज्य आहे. या प्रांतातील शाळांच्या इमारतींना दहशतवाद्यांकडून वारंवार लक्ष्य केले जाते. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रांतातील सर्व शैक्षणिक संस्थांचा आढावा घेण्यात येणार असल्याचे खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर यांनी सांगितले आहे.
गुजरात, दिल्लीमध्येही घडली आगीची दुर्घटना
गुजरातमधील राजकोट शहरात असलेल्या टीआरपी गेम झोनला आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीत २७ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. त्या पाठोपाठ राजधानी दिल्लीच्या विवेक विहार येथील एका बेबी केअर रुग्णालयात भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेत ७ नवजात बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.