मिशीगन येथे राहणारी २६ वर्षीय रेचल स्टँडफेस्टने तिच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला तिच्या जन्माशी संबंधिक एक धडकी भरवणारी घटना सांगितली. तिने सांगितलं की जेव्हा ती ३६ आठवडे म्हणजेच ८ महिन्यांची गर्भवती होती, तेव्हा अचानक रात्री त्यांच्या घराला आग लागली.
रेचेलने सांगितले की, मध्यरात्री का माहित नाही मला असं वाटलं की पायऱ्यांवर बघाव्या. जेव्हा मी पायऱ्यांपर्यंत पोहोचले तेव्हा तिथे मला धूर दिसून आला. मी धावत गेली आणि माझे पती ट्रॅव्हिसला उठवले आणि माझ्या आईला फोन केला. या घटनेची अखेरची स्मृती जी माझ्या लक्षात आहे ती म्हणजे ट्रॅव्हिसने खिडकी तोडली आणि माझी आई जी रस्त्यावर उभी होती ती आम्हाला बाहेर पडायला सांगत होती.
ट्रॅव्हिस मला खिडकीतून खाली सरकवून उतरवण्याचा प्रयत्न करत होता पण आम्ही दुसऱ्या मजल्यावर होतो आणि आम्हाला २० फूट खाली उतरायचं होतं. ही परिस्थिती फारच भीषण होती. मला जिवंत राहायचे असेल तर मला उडी मारावीच लागेल हे मला कळालं होतं. मी २० फूट खाली उडी घेतली आणि त्यामुळे माझे डोके फ्रॅक्चर झाले. येथे ट्रॅव्हिस आगीतून येत बाहेर पडला. मलाही आगीमुळे खूप दुखापत झाली होती. त्यानंतर दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तिथे रेचलचं ऑपरेशन करावं लागलं. माझ्या बाळाचा जन्म झाला. त्यांचं बाळ वाचेल अशी आशा कोणालाही नव्हती. पण, चमत्कार झाला आणि एक निरोगी बाळ जन्माला आलं. रेचलच्या मुलीला आग किंवा २० फुटावरुन पडल्यामुळे काहीही दुखापत झाली नव्हती. आग लागण्याच्या काही आठवड्यांपूर्वी या जोडप्याने तिचे नाव ब्रिनली निवडले होते, परंतु नंतर कळले की हा एक जुना इंग्रजी शब्द आहे ज्याचा अर्थ ‘जळलेली गोष्ट’ आहे. हा निव्वळ योगायोग असू शकत नाही, असं रेचल सांगते.