पृथ्वीपासून इतकी प्रकाशवर्षे दूर
Space.com ने दिलेल्या माहितीनुसार, ज्या एक्सप्लॅनेटचा शोध लागला आहे त्याचे नाव ग्लिसे 12 बी आहे. हा एक लहान ग्रह आणि रेड ड्वॉर्फ स्टार (red dwarf star) ताऱ्याभोवती फिरतो. आपल्या पृथ्वीपासून ग्रहाचे अंतर सुमारे 40 प्रकाशवर्षे आहे. ट्रान्झिटिंग एक्सोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाइट (TESS) च्या मदतीने नासाने एक्सोप्लॅनेटचा शोध लावला. त्याची रुंदी पृथ्वीच्या अंदाजे 1.1 पट आहे. यामुळे तो आकाराने शुक्र ग्रहाच्या बरोबरीचा आहे.
केवळ 12.8 दिवसांचे वर्ष
Gliese 12 b नावाचा एक्सोप्लॅनेट त्याच्या ताऱ्याभोवती खूप जवळून फिरतो. या ग्रहावरील एक वर्ष पृथ्वीवर सुमारे 12.8 दिवसात पूर्ण होते. Gliese 12 b ज्या ताराभोवती फिरतो तो आपल्या सूर्यापेक्षा लहान आणि थंडही आहे. हा ग्रह आपल्या सूर्याच्या जवळ आहे आणि तो खूप लवकर प्रदक्षिणा पूर्ण करतो, मात्र तरीही हा ग्रह एक्सोप्लॅनेट सजीवसृष्टीसाठी योग्य असू शकतो असे सांगितले जात आहे.
वातावरणाबद्दल नक्की माहिती नाही
शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार लिक्विड वॉटरच्या अस्तित्वासाठी हा ग्रह खूप गरम किंवा खूप थंड नाही. मात्र अद्याप , शास्त्रज्ञांना त्याच्या वातावरणाबद्दल अचूक माहिती नाही. येत्या काही दिवसांत याबाबत अधिक माहिती मिळेल, अशी आशा शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
पृथ्वीच्या आकाराचा ग्रह सापडल्याची घटना पहिल्यांदाच घडली नाही. शास्त्रज्ञांनी याआधीच अशा एक्सोप्लॅनेटचा शोध लावला आहे, परंतु आतापर्यंत कोणत्याही ग्रहांमध्ये जीवन असण्याची शक्यता कंफर्म झालेली नाही. आतापर्यंत आपल्या सूर्यमालेबाहेर 5 हजाराहून अधिक ग्रहांचा शोध लागला आहे.
नुकताच शास्त्रज्ञांना सापडला पृथ्वीपेक्षा 9 पटीने जड ग्रह
अंतराळ शास्त्रज्ञांना शोधात पृथ्वीपेक्षा 9 पटीने जड ग्रह सापडला आहे. हा ग्रह ग्रह त्याच्या सूर्यापासून खूप जवळून फिरत आहे. ज्याप्रमाणे आपल्या सूर्यमालेतील बुध आणि सूर्य यांच्यातील केवळ 4 टक्के इतकेच त्याचे अंतर आहे. या ग्रहाचे तापमान सूर्य जवळ असल्यामुळे 1725 अंश सेल्सिअसपर्यंत तापते. हा ग्रह असलेली आकाशगंगा पृथ्वी ग्रहापासून 41 प्रकाशवर्षे दूर आहे.