प्रज्वल रेवण्णा ३१ मे रोजी ‘एसआयटी’पुढे हजर होणार; व्हिडीओ शेअर करीत स्वत: दिली माहिती

बेंगळुरू : महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी तथा कर्नाटकातील हासनचे खासदार प्रज्वल रेवण्णा शुक्रवारी, ३१ मे रोजी कर्नाटक सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकापुढे (एसआयटी) हजर होणार आहेत. महिनाभराहून अधिक काळ परदेशात असलेले प्रज्वल यांनी स्वत: सोमवारी व्हिडिओद्वारे याबाबत माहिती दिली.

‘मी शुक्रवारी सकाळी १० वाजता ‘एसआयटी’पुढे हजर होऊन माझ्यावरील आरोपांची उत्तरे देणाार आहे. मला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे आणि मी पूर्णपणे निष्कलंक असल्याचे न्यायालयाच्या माध्यमातूनच सिद्ध करीन, असा मला विश्वास आहे,’ असे प्रज्वल यांनी या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. ‘देव, जनता आणि कुटुंबीय माझ्या पाठीशी राहतील, असा मला विश्वास आहे. भारतात परतल्यानंतर मी हे प्रकरण बंद करण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्यावर विश्वास ठेवा,’ असे त्यांनी पुढे म्हटले आहे.
Revanna Case: सिद्धरामय्या -कुमारस्वामी यांच्यात जुंपली; रेवण्णा प्रकरणावरुन वाक्‌युद्ध वैयक्तिक पातळीवर
प्रज्वल हे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू असून, या व्हिडिओवर त्यांचे कुटुंबीय किंवा धर्मनिरपेक्ष जनता दलाने प्रतिक्रिया दिली नाही. एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून फरार असल्याने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) प्रज्वल यांच्याविरोधात इंटरपोलमार्फत ‘ब्ल्यू कॉर्नर’ नोटीस जारी केली आहे.

Source link

blue corner noticeH.D. DevegowdaKarnataka governmentPrajwal Revanna caseprajwal revanna obscene video casePraveen Revannasexual harassmentSITvideo evidenceप्रज्वल रेवण्णा
Comments (0)
Add Comment