झोपतांना ब्लूटूथ डीवाइसचा वापर टाळा
अभ्यासातून असे दिसून आले आहे की काही ब्लूटूथ डीवाइसेस तुमच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतात, खासकरून तेव्हा जेव्हा तुम्ही झोपण्याच्यावेळी त्यांचा वापर करत असाल. झोपतांना बेडच्या आजूबाजूला ब्लुटूथ कनेक्टेड डिवाईस ठेवणे टाळा.
ब्लूटूथ हेडफोन
झोपेची समस्या: हेडफोनमधून बाहेर पडणाऱ्या लो फ्रिक्वेंसी असलेल्या रेडिओ वेव्स झोपेत अडथळे आणू शकतात, ज्यामुळे थकवा, डोकेदुखी आणि एकाग्रता कमी होते.
कानात इन्फेक्शन: हेडफोन्स कानात घाण आणि बॅक्टेरिया जमा करू शकतात, ज्यामुळे कानात इन्फेक्शन होऊ शकते.
ब्लूटूथ स्मार्टवॉच
त्वचेला जळजळ: स्मार्टवॉचमधून निघणाऱ्या निकेलमुळे काही लोकांच्या त्वचेला जळजळ जाणवू शकते.
झोपेचा त्रास: स्मार्टवॉचमधून निघणारा ब्ल्यू लाईट झोपेत अडथळा आणू शकतो.
ब्लूटूथ स्पीकर
डोकेदुखी आणि थकवा: स्पीकर्समधून बाहेर निघणाऱ्या RF लहरींमुळे डोकेदुखी आणि थकवा जाणवू शकतो.
एकाग्रता कमी होणे : स्पीकरमधून येणाऱ्या आवाजामुळे एकाग्रता कमी होऊ शकते.
आरोग्यासाठी उत्तम पर्याय
- झोपेत असताना सर्व ब्लूटूथ डीवाइसेस बंद करा.
- हेडफोनचा वापर कमी करा आणि झोपताना ते अजिबात घालू नका.
- स्मार्टवॉच शक्यतो रात्री घालू नका
- स्पीकर किमान 10 फूट अंतरावर ठेवा.
हे लक्षात असू द्या
ब्लूटूथ डीवाइसेस आरोग्यासाठी हानिकारक असतात की नाही यावर अभ्यास सुरु आहे. ब्लूटूथ डिव्हाइस वापरताना तुम्हाला आरोग्याच्या कोणत्याही समस्या आल्यास, डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.