Navratri 2021: श्री भवानी ज्योत प्रज्वलीत करण्यासाठी तुळजा भवानी मातेच्या दरबारात मोठी गर्दी

सोलापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोट्यावधी जनाचे आराध्य दैवत असलेल्या श्री तुळजा भवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह, कर्नाटक तेलंगना आदीसह राज्यातील देवी भक्तांनी व नवरात्र महोत्सव मंडळानी दि.६ बुधवार रोजी श्री तुळजा भवानी मातेच्या राजमाता जिजाऊ महाद्वार व राजे शहाजी महाद्वारसमोर श्री तुळजा भवानी मातेचे बाहेरुन दर्शन घेण्यासाठी व श्री भवानी ज्योत प्रज्वलीत करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

हलग्या निनादात “आई राजा उदो उदो चा गजर करीत श्री तुळजा भवानी मातेचा दरबार भाविकांच्या जयघोषाने गजबजुन गेला होता शहरातील बाजार पेठा मध्ये श्री भवानी ज्योत खरेदी करण्यासाठी व तेल, कापुस, कापूर आदी सह साहित्य खरेदी करण्यासाठी नवरात्र महोत्सव मंडळानी मोठी गर्दी केली होती राज्य सरकारच्या आदेशानुसार दि.७ गुरुवार रोजी घटस्थापनेच्या शुभमुहुर्तावर श्री तुळजा भवानी मातेचे मंदीर उघडण्यात येणार असल्यामुळे श्री देवी भक्ता मध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते शहरातील बाजार पेठा भाविकांच्या गर्दीने गजबजुन गेल्या होत्या संसर्गजन्य कोरोना च्या साथीच्या रोगामुळे गत वर्षी शारदीय नवराञ महोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. मात्र या वर्षी थोडे फार करोनाचे सावट दूर झाल्यामुळे देवी भक्तामधुन या वर्षी नवरात्र महोत्सवात उत्साहाचे वातावरण पसरले होते.

शहरातील बाजार पेठामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने शहरातील व्यापारी वर्गामधुन आनंदाचे वातावरण पसरले होते. त्याचबरोबर श्री तुळजाई नगरीत भाविक श्री देवी दर्शनासाठी येत असल्यामुळे पुजारी, छोटे मोठ्या व्यवसायिकामधुन आनंदाचे वातावरण पसरले होते. परंतु प्रशासकीय यंञणेच्यावतीने शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजा भवानी मातेच्या नगरीतील व्यापारी बंधुना पहाटे ४ ते राञी १० पर्यंत दुकाने उघडी ठेवण्याचे आदेश दिले गेल्यामुळे व्यापारी वर्गामधुन नाराजी व्यक्त केली जात आहे. संसर्गजन्य करोना साथीच्या रोगामुळे गेली दोन वर्षे झाले मोठा त्रास सहन करावा लागला आहे. आमचे मोठे हाल झाले आहेत तरी या वर्षीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात वेळ वाढवून देण्यात यावा अशी मागणी व्यापारी वर्गामधुन होत आहे. बुधवारी शहरातील सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीमुळे गजबजुन गेले होते.

Source link

navratri 2021Shardiya NavratriTuljabhavani Mandir Navratri 2021तुळजाभवानी मंदिरनवरात्री २०२१शारदीय नवरात्री
Comments (0)
Add Comment