Samsung Galaxy F55 5G ची किंमत
Samsung Galaxy F55 5G च्या बेस मॉडेलची किंमत 26,999 रुपये आहे ज्यात 8GB रॅम सह 128GB स्टोरेज मिळते. तर 8GB रॅम व 256 जीबी स्टोरेजसाठी 29,999 रुपये मोजावे लागतील. टॉप मॉडेल 12जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेजसह 32,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
या फोनची विक्री फ्लिपकार्टवर सुरु झाली आहे. कंपनी डिव्हाइसवर 2,000 रुपयांचा इंस्टंट बँक डिस्काउंट देत आहे. सोबत 45वॉट अडॅप्टर 499 रुपये आणि फिट 3 स्मार्ट बँड फक्त 1,999 रुपयांमध्ये मिळेल. फोन रेजिन ब्लॅक आणि अॅप्रिकॉट क्रश अश्या दोन कलरमध्ये उपलब्ध झाला आहे.
Samsung Galaxy F55 5G चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy F55 5G मध्ये 6.7 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा सुपर अॅमोलेड पॅनल 120Hz रिफ्रेश रेट, 1080 x 2400 पिक्सल रिजॉल्यूशन आणि 1000निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. कनेक्टिव्हिटीसाठी डिव्हाइसमध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.2, एनएफसी सारखे ऑप्शन मिळतील.
प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. सोबत 12जीबी पर्यंत रॅम आणि 256जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते. Samsung Galaxy F55 5G अँड्रॉइड 14 वर लाँच झाला आहे, ज्यात 4 वर्षांचे ओएस आणि 5 वर्षांचे सिक्योरिटी अपडेट मिळतील.
Galaxy F55 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात OISला सपोर्टसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.
पावर बॅकअपसाठी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 45वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. अन्य फीचर्स पाहता फोनमध्ये ड्युअल स्टीरियो स्पिकर, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, पाणी आणि धुळीपासून बचाव करण्यासाठी IP67 रेटिंगची सुविधा देण्यात आली आहे.