Vastu Tips : घरात ठेवा या ५ वस्तू, देवी लक्ष्मी होईल प्रसन्न; जीवनात येईल सुख-समृद्धी

Vastu Tips for Money:

वास्तुशास्त्राचे आपल्या जीवनात विशेष महत्त्व असते. असे म्हटले जाते की, वास्तुच्या नियमानुसार काही गोष्टी केल्यास शुभ फले प्राप्त होतात. परंतु, वास्तुशास्त्रातील काही नियम न पाळल्यास त्याचा नकारात्मक परिणाम आपल्यावर होतो.

वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक दिशेपासून गोष्टीला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे घरात कोणतीही वस्तू आणताना ती सकारात्मक ऊर्जा देईल की, नकारात्मक ऊर्जा हे देखील पाहाणे गरजेचे आहे.
Vastu Tips : घरात सतत नवरा-बायकोची भांडण होताय? असू शकतो वास्तुदोष, वेळीच हे उपाय करा
वास्तुशास्त्रानुसार ५ वस्तू घरात ठेवल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. जर तुम्ही सतत आर्थिक अडचणीत सापडत असाल तर या ५ गोष्टी तुमच्या घरात ठेवा. लक्ष्मीची देवीची सदैव राहिल कृपा तसेच जीवनात सुख-समृद्धी येते.

1. घरात कासव ठेवणे

वास्तुशास्त्रानुसार घरात धातुचा कासव ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. कारण कासवाचा संबंध भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीशी असतो. घराच्या उत्तर दिशेला धातुपासून बनवलेले कासव ठेवावे असे म्हणतात. तसेच आयुष्यात कधीही पैशाची आणि समृद्धीची कमतरता भासणार नाही.

2. नारळ

वास्तुशास्त्रानुसार घरात नारळ ठेवणे खूप शुभ असते. असे केल्याने घरात पैसा येण्याचा मार्ग खुले होतील. घराची आर्थिक स्थिती सुधारते. वास्तुशास्त्रात नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नारळात देवी लक्ष्मीचा वास असतो असे म्हटले जाते. घरातील आर्थिक चणचण दूर करण्यासाठी नारळ ठेवणे चांगले असते.
Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार देवघरात बाळ गोपाळाची मूर्ती ठेवताय? या ५ गोष्टी चुकूनही ठेवू नका, ओढावेल संकट

3. पिरॅमिड

वास्तुशास्त्रानुसार घरात पिरॅमिड ठेवायला हवे. असे केल्याने घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होते. घरात क्रिस्टल किंवा कोणत्याही धातूचा पिरॅमिड ठेवला तर त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात. कुटुंबातील व्यक्तींच्या जीवनात सुख-समृद्धी येते.

4. कुबेराची मूर्ती

वास्तुशास्त्रात भगवान कुबेरांला संपत्तीचा कारक म्हटले जाते. कुबेराची मूर्ती घरात ठेवल्याने लक्ष्मीचा सदैव घरात वास होतो. आर्थिक समस्या सुटतात. कुबेर देवाची नियमितपणे पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते अशी धार्मिक मान्यता आहे. उत्पन्नात आणि सौभाग्यात वाढ होते. ज्योतिषशास्त्रात आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळवण्यासाठी कुबेर देवाची पूजा करायला हवी.

टीप :
ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

Vastu RulesVastu TipsVastu Tips For MoneyVastu Tips For SuccessVastu Tips For Wealthलक्ष्मी देवीवास्तु टीप्सवास्तुचे नियमवास्तुशास्त्र
Comments (0)
Add Comment