एसीपी नंदिनी शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी शहरातील चंदन नगर भागात एका ५७ वर्षीय महिलेचा विकृत मृतदेह एका गोणीत सापडला होता. महिलेच्या शरीरावर कोणतीही जखम आढळून आली नाही. शवविच्छेदन अहवालात असं दिसून आलं की ती बऱ्याच काळापासून यकृताची समस्या आणि इतर आजारांनी ग्रस्त होती, ज्यामुळे तिचा नैसर्गिक मृत्यू झाला.
ही महिला गेल्या १० वर्षांपासून एका पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे आढळून आलं. पोलिसांनी तपास केला असता त्यांना राजमोहल्ला परिसरातील एका बागेत ५३ वर्षीय व्यक्ती आढळून आली आणि ती मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे दिसून आलं. चौकशी केली असता त्या व्यक्तीने या महिलेचा मृतदेह तीन दिवस घरात ठेवल्याचे निष्पन्न झाले.
घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी केली होती. त्यानंतर शनिवारी रात्री त्या व्यक्तीने आपल्या लिव्ह-इन पार्टनरचा मृतदेह एका गोणीत टाकला आणि घरापासून सुमारे २०० मीटर अंतरावर नेला. त्याच्याकडून मृतदेह काढता आला नाही, तेव्हा त्याला ती गोणी ओढता आली नाही तेव्हा तो तिथेच रस्त्यावर टाकला आणि परत आला.
एसीपींनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान असे समोर आले की, त्याच्याकडे अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्यामुळे त्याने मृतदेह बेवारस सोडला होता. आता महिलेच्या मृत्यूचा सविस्तर तपास सुरू आहे. त्याआधारे पुढील योग्य ती कायदेशीर पावले उचलली जातील. त्यानंतर पोलिसांनी या महिलेवर अंत्यसंस्कार केले, असं चंदन नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी इंद्रमणी पटेल यांनी सांगितले.