घटना आहे गुजरातच्या अहमदाबादमधील. हिंदू जनविकास सेवा संघातर्फे वस्त्रालच्या एका महापालिका पार्टी प्लॉटमध्ये २७ मे ला सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये ११३ जोडपे लग्नबंधनात अडकणार होते. ज्याच्या नोंदणीसाठी प्रत्येक जोडप्याकडून २२ हजार रुपये घेण्यात आले होते. असे सगळ्या जोडप्यांकडून आयोजकाने एकूण २४ लाख रुपये जमवले. पण विवाहाची कोणतीच तयारी न करता आपले बस्तान बांधले आणि पसार झाला.
विवाहसोहळ्यासाठी जमवलेल्या २४ लाखांतून आयोजकांतर्फे जोडप्यांना मंगळसूत्र, चांदीचे पैंजण आणि झुमके यासह २२ वस्तू दिल्या जाणार होत्या. पण घडले ते उलटेच. पीडित परिवाराच्या म्हणण्याप्रमाणे, सर्व जोडप्यांचे परिवार लग्नाच्या तयारीला लागले होते. परंतु आयोजकांकडून काहीच तयारी होत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित आयोजकाचे कार्यालय गाठले पण त्या कार्यालय बंद असल्याचे दिसले आणि फोन केल्यास तो बंद लागत होता. त्यानंतर त्यांना आयोजकाच्या विरोधात तक्रार दाखल केली.
आमराईवाडी पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत हिंदू जन विकास सेवा संघ ट्रस्टचा ट्रस्टी प्रकाश परमारला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने गेल्याच महिन्यात ११३ जोडप्यांकडून नोंदणीची रक्कम घेत सामूहिक विवाहाचे आयोजन केले होते. परंतु सामूहिक विवाहासाठी मर्यादेपेक्षा जास्त खर्च झाल्यामुळे सामूहिक विवाह होऊ शकला नाही, असे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
Marriage: गोष्ट न झालेल्या ११३ विवाहांची; आयोजकाने सामाजिक बांधिलकीला लावला ‘इतक्या’ लाखांचा चुना
अहमदाबाद : सामाजिक बांधिलकी टिकून राहावी तसेच अविवाहितांना त्यांच्या आयुष्याचा जोडीदार मिळावा म्हणून सामूहिक विवाहाचे आयोजन केले जाते. पण अशाच एका सामूहिक विवाहाच्या आयोजकाने जोडप्यांनाच गंडा घालून पसार झाल्याची बातमी समोर आली आहे. पोलिसांनी काही पीडित जोडप्यांच्या तक्रारीवरुन आयोजकाला बेड्या ठोकल्या आहेत.