Xiaomi नं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्टमध्ये सांगितलं आहे की 14 Civi 12 जूनला लाँच केला जाईल. या पोस्टसह देण्यात आलेल्या फोटोमध्ये कॅमेरा मॉड्यूल दिसत आहे. यात ट्रिपल रियर कॅमेरा युनिटसह Leica ब्रँडेड लेन्स आहेत. या स्मार्टफोनमध्ये एक सर्कुलर मॉड्यूलमध्ये कॅमेरा आहेत. याचा कॅमेरा मॉड्यूल एक मेटॅलिक रिंग मध्ये आहे. चीनमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कंपनीची Civi सीरीज येत आहे. ही शाओमीच्या मिड-रेंज आणि प्रीमियम स्मार्टफोन्स मधील दुवा आहे.
गेल्या आठवड्यात शाओमीनं X वर पोस्ट केलेल्या व्हिडीओ मध्ये अमेरिकन डिवाइस निर्माता Apple च्या ‘क्रश’ जाहिरातीला टोमणा मारला होता. या जाहिरातीत एक हाइड्रॉलिक प्रेस विविध म्यूजिकल इंस्ट्रूमेंट्स आणि आर्ट प्रोडक्ट्सना चिरडले आहे आणि त्यानंतर नवीन M4 चिप असलेला iPad Pro समोर येतो. शाओमीचा व्हिडीओ देखील अशाप्रकारे सुरु होतो परंतु यात हायड्रॉलिक प्रेस खाली गेल्यावर ती तुटते आणि स्क्रीनवर ‘सिनेमॅटिक टेक्स्ट’ लिहलेलं दिसतं. त्यानंतर ‘कमिंग सून’ लिहण्यात आलं आहे. या दोन्ही शब्दांचे पहिले दोन अक्षर लाल कलरच्या फॉन्ट मध्ये असल्यामुळे हा टीजर Civi सीरीजचा आहे हे स्पष्ट झालं होतं.
Xiaomi CiVi 14 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
फोन 6.55 इंचाच्या OLED डिस्प्लेसह येईल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. यात क्वॉलकॉमचा Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. शाओमी सिवी 4 प्रो मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50MP चे दोन सेन्सर आणि 12MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चे दोन कॅमेरे फ्रंटला मिळतील, जी या फोनची खासियत म्हणता येईल. शाओमी सिवी 4 मध्ये 4700mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात ड्युअल सिम स्लॉट, वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ आणि यूएसबी टाईप-सी पोर्ट देण्यात आला आहे. तसेच, हा मोबाइल फोन लेटेस्ट Android 14 वर चालतो.