रियान पराग सारखी चूक करू नका, या 10 गोष्टी कधीच ऑनलाइन शेयर करू नका

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा रियान पराग सोशल मीडियावर ट्रॉल होत आहे. यामागे त्याची आयपीएलमधील कामगिरी कारणीभूत नाही तर त्याने केलेलं युट्युब स्ट्रीमिंग कारणीभूत आहे. आयपीएलनंतर नुकतेच रियानने युट्युब स्ट्रीमिंग केलं होतं, त्यात कॉपी राईट फ्री म्युजिक असा सर्च करताना त्याची सर्च हिस्ट्री दिसली. त्याच्या सर्च हिस्ट्रीमध्ये अनन्या पांडे हॉट तर सारा अली खान हॉट आणि विराट कोहली यांची नावे दिसल्यामुळे तो ट्रॉल होत आहे. अशी चूक तुम्हाला करायची नसेल तर पुढील गोष्टी कधीच ऑनलाईन शेयर करू नका.

ट्रॅव्हल प्लॅन्स

तुमच्या भविष्यातील प्रवासाचा प्लॅन किंवा प्रवास सुरु असताना ट्रिपचे फोटो पोस्ट करण्यापूर्वी हजार वेळा विचार करा. त्या माहितीचा गैरवापर केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ तुम्ही घरी नाही हे समजल्यावर घरी चोरी होण्याची शक्यता वाढते. अश्या काही घटना देखील घडल्या आहेत. अश्यावेळी प्रवास संपवून घरी आल्यावर फोटो पोस्ट करणे केव्हाही उत्तम.
मोबाईल रिपेअर करण्यासाठी दुकानदार करतोय भरमसाट पैशांची मागणी, तरीही पार्ट ओरिजनल असल्याची गॅरंटी नाही, कसे ओळखाल

लोकेशन डेटा

सोशल अ‍ॅप्स तुमचं जिओ लोकेशन आपोआप घेतात. पोस्ट करण्यापूर्वी जिओ लोकेशन बंद करा. बऱ्याचदा तुम्ही पोस्ट केलेल्या फोटोच्या मेटा डेटामध्ये तुमचं लोकेशन असतं. आणि हा डेटा शेयर करण्याची तशी कोणतीही गरज नसते. शक्यतो लोकेशन डेटा शेयर करणे टाळा. तुम्ही तुमचा पत्ता आणि फोन नंबर सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर शेयर केला नाही पाहिजे. कोण कशाप्रकारे या माहितीचा गैरवापर करता येईल, सांगता येत नाही.

ओळख

तुमची ओळख चोरता येईल अशी बरीचशी माहिती फेसबुक सारख्या साइटवर शेयर केली जाते. तुमची जन्मतारीख, ड्रायविंग लायसन्स, पासपोर्ट किंवा क्रेडिट कार्ड अशी माहिती कधीच ऑनलाइन शेयर करू नका. तसेच काही अ‍ॅप्स ‘फन क्वीज’च्या नावाखाली अशी माहिती विचारून घेतात त्यांच्यापासून देखील सावध रहा. या माहीतच वापर तुमच्या नावाने गुन्हे करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.

खाजगी तक्रारी

तुमच्या बॉस, सहकारी किंवा नातेवाईकांची तक्रार ऑनलाइन करणे योग्य नाही. यामुळे भांडण वाढू शकतं. हल्ली कंपन्या तुमची सोशल मीडिया हिस्टरी देखील चेक करतात आणि मगच जॉब अ‍ॅप्लिकेशन स्वीकारतात. त्यामुळे अश्या पोस्ट करून तुमच्या संधी कमी करू नका.

बेकायदेशीर कामाचे पुरावे

सोशल मीडियावर केलेल्या एखाद्या विनोदामुळे देखील अनेकांना अटक झाल्याचा घटना तुम्ही वाचल्या असतील. मग जर तुम्ही एखाद्या बेकायदेशीर कामाचे पुरावे ऑनलाइन पोस्ट केलेत तर तुम्हाला किती महागात पडू शकते याचा विचार करा. तुम्ही अगदी खतरनाक गुन्ह्यांचे पुरावे पोस्ट कराल याची शक्यता कमी आहे परंतु ट्राफिक नियमांचे पालन न केल्याची पोस्ट देखील तुम्हाला अडचणीत आणू शकते. काही लोकांना केक कापताना तलवार वापरली म्हणून देखील अटक झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

महागड्या वस्तूंची खरेदी

नवीन फोन, लॅपटॉप, टीव्ही, दागिने, वाहन इत्यादी खरेदी केल्यास ते सोशल मीडियावर पोस्ट करू नका. काही लोकांना ते चोरण्याचा किंवा त्याचा गैरवापर करण्याचा मोह होऊ शकतो.

खाजगी सल्ला

तुम्ही किती जरी तज्ज्ञ असलात तरी सोशल मीडियावर कायदेशीर किंवा मेडिकल सल्ले देणे टाळा. हा नियम वकील आणि डॉक्टरांना देखील लागू पडतो. सोशल मीडियावरून संपूर्ण माहिती मिळत नाही त्यामुळे जर तुम्ही चुकीची माहिती दिली. त्याचे परिणाम चांगले झाले नाहीत तर ती व्यक्ती तुमच्या विरोधात कायदेशीर कारवाई करू शकते.

फसवणूक करणाऱ्या स्पर्धा

मोठ्या कंपन्या सोशल नेटवर्कवर गिव्हअवे करून भाग्यवान विजेत्यांना मोफत वस्तू देतात. परंतु असंच फसवणूक करणारे लोक देखील फेक अकाऊंट्सच्या माध्यमातून करतात. त्यामुळे अश्या पोस्ट शेयर करण्यापूर्वी हजार वेळा विचार करा.

इन्साईड इन्फॉर्मेशन

तुमच्या कंपनीची स्ट्रॅटेजी किंवा एखादा मोठा निर्णय सोशल मीडियावर पोस्ट करणं महागात पडू शकतं. तसेच कुटुंबातील देखील माहिती खाजगी ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक माहितीचा गैरवापर केला जाऊ शकतो हे विसरू नका.

जे लोकांनी पाहू नये असं तुम्हाला वाटतं

एखादा खाजगीतला फोटो, स्क्रिनशॉट किंवा इतर कोणतीही माहिती जी तुम्हाला लोकांपर्यंत पोहचवायची नाही ती शेयर करू नका. बऱ्याचदा अशी माहिती प्रायव्हेट अकॉऊंट आहे म्हणून किंवा फक्त क्लोज फ्रेंड्सच्या यादीत शेयर केली जाते. परंतु एखादी गोष्ट सोशल मीडियावर पोस्ट केली तर ती प्रायव्हेट राहत नाही हे विसरू नका.

Source link

riyan paragriyan parag search historyriyan parag trolledsocial mediathings you should not shareरियान परागसोशल मीडिया
Comments (0)
Add Comment