Fact Check : मशिदीत RSS स्वंयसेवकाची हत्या? व्हायरल व्हिडिओचे सत्य आले समोर | Maharashtra Times

नवी दिल्ली – सोशल मीडियावर दोन व्हिडिओ व्हायरल होत आहे, यामध्ये व्हिडिओ केरळचा आहे असा दावा करण्यात येतोय, यामध्ये मुस्लिम जमाव एका तरुणाला मारहाण करताना पाहायला मिळतो हा तरुण RSS चा कार्यकर्ता आहे, मुस्लिम समाजाने याच आरएसएस कार्यकर्त्याची मशिदीत निर्घृण हत्या केली असा दावा हा व्हिडिओ व्हायरल करत सोशल मीडियावर केला जातोय, पण जेव्हा बूम वृत्तसंस्थेने याचा पाठपुराला केला तर हा व्हिडिओतील दावा खोटा आढळून आलाय.

नेमके काय होते शेअर पाहा..

सोशल मीडियावर युजर्स हा व्हिडिओ आरएसएस कार्यकर्त्याला मारहाणीचा आहे असे दावा करुन व्हायरल करतायत. धडापासून शिर वेगळे करणारे बहुसंख्य मुस्लिम असल्याचे सांगत हिंदू खतरे में है असा मॅसेज फिरवण्यात येतोय.

“पूर्ण देशात असेच जर मुस्लिम बहुसंख्य झाले तर न्याय व्यवस्था, संविधान किंवा कोणतेही पोलिस तुमचे किंवा तुमच्या संपत्तीचे रक्षण करु शकणार नाहीत, म्हणून हिंदू व्होट बँक बनले पाहिजे, नाहीतर बांग्लादेश, पाकिस्तान, अफगणिस्तान मध्ये हिंदूना कसे पळवले तसे पळवून लावतील आणि काश्मीर, बंगाल, केरळमध्ये जसे मारहाण होते तसे एकटे पाहून हिंदूवर हल्ला करतील म्हणून एकजूट होवून मोदी आणि योगीला समर्थन देवूया भाजपाचे सत्तेत असणे गरजेचे आहे, मूर्ख हिंदूनो जागे व्हा” असा मॅसेज व्हिडिओसहित सोशल मीडियावर फिरतोय. हाच दावा करणारी एक पोस्ट फेसबूक वर सापडलीय. अर्काइव लिंक
Fact Check: स्वाती मालीवाल यांना मारहाण? व्हायरल व्हिडिओमधून दावा, जाणून घ्या सत्य

दावा खोटा कसा ठरला!

बूम या वृत्तसंस्थेने दोन्ही व्हिडिओचा पाठपुरावा केला तर ५ मे २०२१ मधील अमर उजाला वृत्तपत्रातील एक बातमी मिळाली. बातमीत हा व्हिडिओ मुजफ्फरनगरमधला सांगितला आहे. बातमीनुसार मुजफ्फनगरमधील सिकरी गावात वीज दुरुस्तीसाठी पोहचलेल्या विद्युत तांत्रिकीसोबत काही भांडण झाल्याने स्थानिक लोकांनी त्या व्यक्तीला मारहाण केली आणि त्यामध्ये मुस्लीम समाजाचे सुद्धा काही लोक असल्याचे व्हिडिओत दिसते.याच व्हिडिओची मुजफ्फरनगर पोलिसांची सुद्धा पोस्ट मिळाले ज्यामध्ये पोलिसांनी कारवाईचे निर्देश दिलेत. अर्काइव लिंक
व्हिडिओची लिंक-

याबाबत सीकरी पोलीस चौकीच्या तत्कालीन पोलिस अधिकारी रमेश पाल यांनी सांगितले हा व्हिडिओ बराच जुना आहे आणि याप्रकरणात काही आरोपींना अटक सुद्धा करण्यात आले तसेच या प्रकरणात कोणाची हत्या झाली नव्हती असे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले.

दुसऱ्या व्हायरल व्हिडिओचे सत्य काय?

दुसरा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्याला बूम वृत्तसंस्थेने रिवर्स केला तर मेट्रो या वेबसाईटवर व्हिडिओ संदर्भातील पोस्ट मिळाले. युकेस्थित वेनजुएला मधला हा व्हिडिओ असून या सदर्भांतील बातमी सुद्धा स्थानिक वृत्तपत्रात दिली आहे. Megababdas Gang च्या काही लोकांनी एका मुलाची निर्घृण हत्या केली. द सन या वृत्तपत्रात सुद्धा हीच बातमी नमूद आहे की तेरा वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्यात आले. यावरुन हे दोन्ही व्हिडिओ आणि दावे खोटे असल्याचे स्पष्ट होते. याच दोन्ही व्हिडिओंना चुकीच्या मॅसेजसहित सामाजित तेढ निर्माण करण्यासाठी फिरवले जात असल्याचे समोर येते.

निष्कर्ष

बूमच्या पडताळणीत केरळमध्ये मुस्लिमाद्वारे RSS कार्यकर्त्याची मशिदीत निर्घृण हत्या झाली हा दावा पूर्णपणे खोटा आहे असे स्पष्ट होते. तसेच दोन्ही व्हिडिओ एकत्रित करुन मुद्दाम सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.

(This story was originally published by Boom, And Republished by Maharashtra Times As part of the Shakti Collective)

Source link

KerlaRSSRSS jarykarta viral videoViral video fact checkViral video of rss karykartaआरएसएस कार्यकर्ताकेरळव्हायरल व्हिडिओ
Comments (0)
Add Comment