Fact Check : निवडणुकीच्या गॅरंटीला अर्थ नाही, पंतप्रधान मोदींसाठी अमित शाह असं म्हणाले? जाणून घ्या सत्य

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांदरम्यान सोशल मीडियावर गृहमंत्री अमित शाह यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अमित शाह असं बोलताना दिसत आहेत, की निवडणुकीच्या गॅरंटीला काही अर्थ नाही, ते निवडणुकीपर्यंत बोलतात आणि नंतर विसरतात. या व्हिडिओबाबत सोशल मीडियावर दावा केला जात आहे, की ही बाब अमित शाह पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी बोलत आहेत. मात्र ज्यावेळी या व्हायरल व्हिडिओची पडताळणी केली गेली त्यावेळी व्हायरल होणारा व्हिडिओ संपूर्ण नसल्याचं समोर आलं आहे. संपूर्ण व्हिडिओतील काही सेकंदाचा भाग घेऊन तो चुकीच्या दाव्यासह शेअर केला जात आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हिडिओ शेअर करत एका युजरने लिहिलंय, ‘अमित शाह यांनी जुमल्याचा अविष्कार केला होता. आता गॅरंटीचा कोणताही अर्थ नाही असं ते बोलत आहेत. हे निवडणुकांपर्यंत बोलतात आणि नंतर विसरतात. एकंदरीत त्यांना पंतप्रधानांची खुर्ची स्वतः काबीज करायची आहे. आधी त्यांनी जुमलेबाजच्या नावाखाली मोदींना गोवले, आता गॅरंटीचीही वाट लावली आहे.’

(अर्काइव पोस्ट)

Fact Check:पश्चिम दिल्लीतून आप उमेदवार महाबल मिश्रा यांना RSS चं पत्र? जाणून घ्या सत्य

अशी केली व्हायरल व्हिडिओची पडताळणी

अमित शहा यांच्या व्हायरल व्हिडिओची पडताळणी करण्यासाठी इनविड टूलच्या मदतीने व्हिडिओची कीफ्रेम रिव्हर्स इमेज गुगलवर सर्च करण्यात आली. ANI या वृत्तसंस्थेच्या यूट्यूब चॅनलवर १५ मे २००४ रोजी अमित शाह यांच्या एका मुलाखतीचा व्हिडिओ आढळला. त्यावरुन व्हायरल झालेला व्हिडिओ क्रॉप करण्यात आल्याचं समजतं आहे.

व्हिडिओमध्ये २५ मिनिटे १४ सेकंदावर अमित शाह यांना काँग्रेसच्या गॅरंटीबाबत प्रश्न विचारला जातो की तुम्ही काँग्रेसच्या गॅरंटीला चायनीज गॅरंटी म्हटलं आहे. मुलाखतीत या प्रश्नावर अमित शाह यांनी उत्तर दिलं, की मी आता तेलंगणामध्ये गेलो होतो. तिथे महिला वाट पाहत होत्या की आमचे १२००० रुपये कधी येणार. तिथे शेतकरी दोन लाख रुपये कर्जमाफीसाठी वाट पाहत आहेत. तेथील मुली स्कूटीची वाट पाहत आहेत. राहुल गांधींनी आश्वासन दिलं होतं. त्यांची गॅरंटी होती.

याच मुलाखतीत अमित शाह यांना विचारलं जातं, की ‘त्यावेळी दक्षिणेत निवडणुका होत्या, आता संपल्या. आता राहुल गांधी उत्तरेत आले आहेत’. या प्रश्नाचं उत्तर देताना अमित शाह यांनी म्हटलंय, ‘दक्षिणेत ज्यावेळी निवडणुका होत्या, त्यावेळी ते तिथे जात होते. त्यामुळेच मी म्हणतो की त्यांच्या गॅरंटीचा कोणाताही अर्थ नाही, ते निवडणुकांपर्यंत बोलतात आणि नंतर विसरुन जातात.’

निष्कर्ष

व्हायरल व्हिडिओच्या तपासात असं आढळलं, की सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ क्रॉप करण्यात आला आहे. तो चुकीच्या दाव्यासह व्हायरल करण्यात आला आहे. मूळ व्हिडिओमध्ये गृहमंत्री अमित शाह क्राँग्रेसवर निशाणा साधताना दिसत आहेत.

(This story was originally published by Boom Live, and republished by NBT as part of the Shakti Collective.)

Source link

amit shahamit shah Fact Checkamit shah viral video fact checkfact check newsLok Sabha 2024अमित शाहअमित शाह फॅक्ट चेकफॅक्ट चेक बातमी
Comments (0)
Add Comment