अपहृत मुलांची सुटका करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोळीबार, डीवायएसपी थोडक्यात वाचले!

हायलाइट्स:

  • अहमदनगरमधील राहुरी तालुक्यात धक्कादायक प्रकार
  • पोलीस पथकावर आरोपीचा गोळीबार
  • डीवायएसपी थोडक्यात बचावले!

अहमदनगर: अपहृत मुलाची सुटका करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर आरोपीनं गोळीबार केल्याची घटना घडली आहे. गोळीबारात डीवायएसपी संदीप मिटके थोडक्यात बचावले आहेत. संबंधित आरोपीला जेरबंद करण्यात आलं असून हा आरोपी पुण्यातील बडतर्फ पोलिस अधिकारी असल्याची माहिती आहे.

राहुरी येथे नुकतेच बंदुकीच्या जोरावर एका प्रतिष्ठित महिलेचे अपहरण करून ‘माझ्याशी संबंध ठेव’, असे सांगत मारहाण करण्याऱ्या निलंबित पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला होता. ‘माझ्यावर खोटा गुन्हा दाखल का केला?’ असे म्हणत या पोलीस अधिकाऱ्यानं महिलेच्या घरी गोळीबार करून धुडगूस घातला. त्या महिलेच्या मुलांना डांबून ठेवले होते. त्यांना वाचविण्यास गेलेले श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्यावर आरोपीने रिव्हलवर रोखले, मिटके यांनी प्रसंगावधान राखल्याने गोळी चुकली आणि उपअधीक्षक मिटके हे थोडक्यात बचावले.
गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली.

वाचा: ‘माझ्यावरील कारवाई समजू शकतो, पण बहिणींच्या कंपन्यांवर छापे कशासाठी?’

आरोपी पुणे येथील निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे. त्याने गुरुवारी सकाळी डिग्रस येथील त्या महिलेच्या घरात प्रवेश केला. रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लहान मुलांना डांबून ठेवले. महिलेने परिचितांना या घटनेची माहिती दिली. थोड्याच वेळात पोलिसांचा फौजफाटा तेथे दाखल झाला. सुटका करण्याचे काम सुमारे दोन तास सुरू होते. अखेर पोलिसांनी आरोपीवर झडप घालून त्याच्याकडील शस्त्र काढून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटली, ती अधीक्षक मिटके यांचा डोक्याजवळून गेली. यातून मिटके थोडक्यात बचावले. आरोपीला ताब्यात घेण्यात असले. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

वाचा: शेतकरी वाऱ्यावर पडलाय का? मोगलाई आहे का?; अजित पवार भडकले!

Source link

Ahmedangar Crime newsKidnapper fire on Police TeamRahuriअहमदनगरराहुरी
Comments (0)
Add Comment