घरबसल्या करा लाखोंची कमाई, फक्त Telegram वर करा छोटंसं काम

टेलीग्राम एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. इथे व्हिडीओ असो किंवा मेसेज एकाच वेळी हजारो लोकांपर्यंत शेयर करता येतो. टेलीग्रामवर चॅनेल बनवून कंटेंट शेयर करता येतो. अनेकजण याचा वापर करून कमाई देखील करतात. एकाच वेळी हजारो लोकांना मेसेज पाठवता येत असल्यामुळे तुम्ही इथे वस्तू विकून किंवा दुसऱ्यांचे बिजनेस प्रमोट करून देखील सहज कमाई करू शकता. टेलिग्राम देखील चॅनेल मॉनिटाईज करण्याचा पर्याय देत आहे. चला जाणून घेऊया टेलिग्राम चॅनेल कसं बनवायचं.

टेलीग्राम चॅनेल बनवण्याची पद्धत

  • टेलीग्रामवर चॅनेल बनवण्यासाठी काही स्टेप फॉलो कराव्या लागतील, ज्या फॉलो करून अगदी सहज चॅनेल क्रिएट करता येईल.
  • सर्वप्रथम टेलीग्राम अपडेट करा आणि ओपन करा.
  • कंपोज आयकॉनवर टॅप करा, इथे बॉटम राइट कॉर्नरमध्ये पेंसिल आयकॉन दिसेल.
  • त्यानंतर तुमच्या समोर तीन ऑप्शन येतील, ज्यातील तिसऱ्या नंबरवर “New Channel” वर टॅप करा.
  • चॅनेलचं नाव टाइप करा आणि त्याखाली डिस्क्रिप्श टाका. फोटो सेट करण्याचा पर्याय मिळेल. नाव युनिक असेल याची काळजी मात्र घ्या.
  • त्यानंतर तुम्हाला चॅनेल टाइप सिलेक्ट करण्याचा ऑप्शन येईल, जसे की पब्लिक किंवा प्रायव्हेट. पब्लिक चॅनेल कोणीही सर्च करून जॉइन करू शकतं, तर प्रायव्हेट चॅनेल जॉइन करण्यासाठी इन्व्हाईट लिंक पाठवावी लागेल.
  • तसेच काही आवश्यक परवानग्या द्याव्या लागतील, जसे की चॅनेलवरून काही डाउनलोड काण्याची परवानगी असेल की नाही हे तुम्ही ठरवू शकता.

हे देखील वाचा: एकाच फोनवर दोन नंबरवरून WhatsApp वापरा; वापर ‘हि’ मजेदार ट्रिक

डेस्कटॉपवर चॅनेल बनवण्याची प्रॉसेस

  • सर्वप्रथम टेलीग्राम कम्प्युटरमध्ये इंस्टॉल करा.
  • मेन्यू बटनवर क्लिक करा, जो तीन लाइन्सच्या ऑप्शनमध्ये मिळेल.
  • आता तुम्हाला त्याचा स्टेप फॉलो कराव्या लागतील ज्या मोबाइलवर टेलीग्राम चॅनेल बनवण्यासाठी फॉलो कराव्या लागतात.

टेलीग्राम चॅनेलचे फायदे

  • टेलीग्राम चॅनेलवर लोकांना जोडण्याची मर्यादा नाही.
  • मेसेज एकाचवेळी हजारो लोकांना पाठवता येतात.
  • बिजनेस आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी फायदेशीर.
  • प्रायव्हसी सिक्योर राहते.

Source link

how to create a telegram channeltelegram channelघरबसल्या कमाईटेलिग्रामटेलिग्राम चॅनल बनवण्याची पद्धतटेलिग्राम चॅनेल
Comments (0)
Add Comment