टिप्सटर Mukul Sharma नं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्टमध्ये सांगितलं आहे की या स्मार्टफोनची विक्री जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरु केली जाईल. हा ई-कॉमर्स साइट Flipkartच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा Moto G04 चा अपग्रेडेड व्हर्जन असू शकतो. Moto G04 मध्ये 16 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. Moto G04s मध्ये 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा असेल. टिप्सटरनं म्हटलं आहे की या स्मार्टफोनची प्राइस Moto G04 सारखी असू शकते. Moto G04 च्या 4GB रॅम व 64GB स्टोरेज आणि 8GB रॅम व 128 GB व्हेरिएंट्सची किंमत अनुक्रमे 6,999 रुपये आणि 7,499 रुपये आहे.
मोटोरोलाचा Razr 50 Ultra देखील लवकरच लाँच केला जाऊ शकतो. कंपनीनं याबाबत माहिती दिली नाही. परंतु लिक्सनुसार या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8s Gen 3 चिपसेट दिला जाऊ शकतो. याची बॅटरी 4,000 mAh ची असू शकते. अलीकडेच टिप्सटर Steve Hemmerstoffer नं Motorola Razr 50 Ultra चे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत लीक केली होती. याच्या 12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 999 युरो (जवळपास 83,000 रुपये) असू शकते. गेल्यावर्षी सादर करण्यात आलेल्या Razr 40 Ultra ची देखील इतकीची किंमत होती. हा स्मार्टफोन मिडनाइट ब्लू, हॉट पिंक आणि स्प्रिंग ग्रीन कलर्स मध्ये उपलब्ध होऊ शकतो. यात 6.9 इंच (1,080 x 2,640 पिक्सल) OLED डिस्प्ले आणि 3.6 इंचाचा कव्हर डिस्प्ले मिळू शकतो.
या स्मार्टफोनमध्ये प्रोसेसर म्हणून Snapdragon 8s Gen 3 असू शकतो. यात 12GB RAM आणि 256 GB स्टोरेज असू शकते. यातील ड्युअल रियर कॅमेरा युनिटमध्ये 50 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो. तसेच फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो. Motorola Razr 50 Ultra ची 4,000mAh ची बॅटरी USB Type-C चार्जिंग सपोर्टसह मिळू शकते.