Googleसाठी हा निर्णय घेणे कठीण
Google ने सांगितले, “आम्हाला माहीत आहे की ही अनेक लोकांसाठी वाईट बातमी असू शकते – कारण आम्ही आमच्या टूल्समध्ये सतत सुधारणा करत असतो, आम्हाला कधीकधी कठीण निर्णय घ्यावे लागतात ज्यामुळे आम्ही घेतलेला एक निर्णय असंख्य बिजनेसेसवर परिणाम करतो.” तुम्ही तुमचा बिजनेस मॅनेज करण्यासाठी काही फिचर्स वापरता मात्र कंपनी देखील भविष्यातील ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी अशाप्रकारचे कठीण निर्णय घेते.
कंपनीने सांगितले फीचर बंद करण्याचे कारण
Google ने घेतलेल्या या निर्णयामागचे कारण म्हणजे कंपनीने आपली फंक्शनॅलिटी सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. कंपनीच्या स्पिकरने सांगितले की, “आमचे प्रॉडक्ट्स यूजर्स बिजनेसेसच्या बदलत्या गरजा पूर्ण करतात का याची खात्री करण्यासाठी आम्ही सतत टेस्टिंग करत असतो. बिजनेसबद्दल कम्युनिकेशन एक्सपीरियंस सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.
बिजनेसवर परिणाम होण्याची शक्यता
बिझनेस मेसेजेस बंद केल्यामुळे पूर्णपणे या फिचरवर अवलंबून असलेल्या व्यवसायांवर परिणाम होऊ शकतो. ॲप-मधील या चॅट सर्विसला प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांना आता कम्युनिकेशनसाठी दुसऱ्या मार्गाकडे वळावे लागेल.
Google ने बिझनेस मेसेजेसच्या रिप्लसमेंटबाबत स्पष्टपणे सांगितले नसले तरी, बीजनेसेसला त्यांच्या Google बिझनेस प्रोफाइलमधील फोन नंबर, ईमेल पत्ते आणि वेबसाइट लिंक यासारखी माहिती असलेले फिचर्सचा वापर करण्यास सांगितले जाऊ शकते.