राहुल गांधींचा पाकला पाठिंबा, ५००० कोटींचं कर्ज देणार? व्हायरल स्क्रीनशॉटमागील सत्य काय?

नवी दिल्ली: विधानसभा निवडणुका जवळ आल्याने सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत आहेत. एबीपी न्यूज चॅनेलचाही एक कथित स्क्रीनशॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या स्क्रीनशॉटमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे कथित विधान दिसत आहे. यामध्ये त्यांनी पाकिस्तानला पाठिंबा देणं महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे आणि ते तसंच करतील. इतकंच नाही तर त्यांनी पुढील ५० वर्षांसाठी पाकिस्तानला पुढील काळात ५ हजार कोटी रुपयांचे कर्ज बिनव्याजी देण्याचे आश्वासनही दिले आहे.

वरील स्क्रीनशॉट हा २८ नोव्हेंबरला फेसबुक ग्रूप मिशन मोदी २०१९ मध्ये आपले १०० मित्र जोडा यामध्ये पोस्ट करण्यात आला होता. या ग्रुपचे ५,००,०० पेक्षा जास्त सदस्य आहेत आणि ही पोस्ट आतापर्यंत ७००० पेक्षा जास्त वेळा शेअर करण्यात आली आहे. हा स्क्रीनशॉट फेसबुकवर मोठ्या संख्येने व्हायरल करण्यात आला आहे.

व्हायरल पोस्टमध्ये राहुल गांधींच्या नावासोबत दोन विधानं दिसून येत आहेत.

  • पहिलं – पाकिस्तानला मदत करणे आवश्यक आहे आणि आम्ही ती नक्की करु
  • दुसरं – आमचं सरकार येताच पाकिस्तानला ५० वर्षांसाठी ५ हजार कोटींचं कर्ज बिनव्याजी देऊ.

फॅक्ट चेक न्यूज

फॅक्ट चेक

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा स्क्रीनशॉट फॅक्ट चेकमध्ये खोटा असल्याचं दिसून आलं आहे. चॅनलवर अशी कोणतीही बातमी दाखवण्यात आलेली नव्हती, असा दावा केला जात आहे. ABP News चे संपादक पंकज झा यांनी स्वत: याबाबत स्पष्टीकरण देत सांगितलं की, “हा स्क्रीनशॉट फेक आहे”.

एबीपी न्यूजचं बॅकग्राऊंड वापरण्याची ही रणनीती मोठ्या प्रमाणात वापरण्यात येते. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये, चॅनेलने सोशल मीडिया वापरकर्त्यांना चॅनेलच्या नावात फेरफार करून फेक न्यूज पसरवली जात असून त्यापासून सावध राहण्यास सांगितले होते.

याआधी भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनाही अशाच प्रकारे लक्ष्य करण्यात आले होते, जेव्हा शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान एबीपी न्यूजच्या बनावट स्क्रीनशॉट्सद्वारे त्यांच्या नावाने बनावट विधान प्रसारित करण्यात आले होते.

निष्कर्ष

यावरून असं सिद्ध होते की, हा व्हायरल स्क्रीनशॉट हा फेक आहे. एबीपी न्यूजने २०१८ मध्येच स्पष्ट केले होते की, अशी कोणतीही बातमी एबीपी न्यूजने प्रसारित केलेली नाही. तरीही या निवडणुकीत हा स्क्रीनशॉट पुन्हा एकदा व्हायरल होतो आहे.

(This story was originally published by Fact Crescendo)

Source link

fact check newsFact Check StoryRahul Gandhirahul gandhi statement about PakistanRahul Gandhi Viral StatementRahul Gandhi Viral videoViral News on Rahul Gandhiफॅक्ट चेकफॅक्ट चेक स्टोरीराहुल गांधी
Comments (0)
Add Comment